उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- आमआदमी पक्षाच्या वतीने आज ३ एप्रिल २०२३ रोजी देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी कुलभूषण रामटेके यांना शहरातील विविध समस्यांची निवेदनाद्वारे जाणीव करून देत तात्काळ यावर अंमलबजावणी करण्यात यावी; यासंदर्भात आप पदाधिकऱ्यांच्या शिष्टंडळासह निवेदन सादर करण्यात आले आहे.
आम आदमी पक्षाने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,पोलीस स्टेशन बाजूचा मार्ग ते नगर परिषद व तहसील कार्यालयाकडे जाणारा मार्गाची पुरती वाट लागली आहे.सदर मार्ग नगर परिषद हद्दीत असूनही रस्त्याकडे नगरप्रशासन व कुणीही लक्ष देत नाही.त्यामुळे मार्गावरून ये-जा करणारे वाहन धारकांची एखादेवेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.नगर परिषदेच्या प्रशासनाने लक्ष घालावे व दुरुस्ती करावी.
मुख्य मार्गावरील व इतर मार्गावरील पथदिवे कित्येक दिवसापासून बंद आहेत नागरिकांना रात्रीच्या सुमारास नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे बंद स्वरूपातील पथदिवे लवकरात लवकर सुरु करण्यात यावे.देसाईगंज नैनपुर वार्डातील नगरपरिषद शाळेची भिंत अतिशय खराब अवस्थेत असल्याने सदर शाळेची रंगरंगोटी करण्यात यावी व परिसरातील साफसफाई करण्यात यावी.परिसर स्वच्छ तर सर्वच नीटनेटके व विद्यार्थी रममय वातावरण राहणार.
जुनी वडसा मार्गावरील झेन लॉन च्या बाजूस असलेल्या नाल्याची गेली कित्येक वर्षांपासून साफसफाई करण्यात आलेली नाही.परिणामी सदर नाला पूर्णपणे भरून राहत असल्यामुळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरलेले आहे.सकाळच्या सुमारास व सायंकाळच्या सुमारास शहरातील नागरिक सदर मार्गाने ये-जा करीत असल्याने दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.देसाईगंज नगर परिषद हद्दीतील समस्या अतिशय गंभीर स्वरूपाच्या असून याकडे गांभीर्य पूर्वक मुख्याधिकारी यांनी लक्ष घालावे; अशी मागणी देसाईगंज आम आदमी पक्षाच्या शिष्ट मंडळाद्वारे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदन सादर करतेवेळी फारुख पटेल,नाजूक लुटे, वामन पगाडे,प्रमोद दहिवले,अतुल ठाकरे,देवा जांभूळकर,शिल्पा बोरकर,दिपक नागदेवे व आपचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.