Saturday, June 27, 2026
Homeगडचिरोली २.१२ लक्ष लाभार्थ्यांना गडचिरोली जिल्ह्यात मिळणार 'आनंदाचा शिधा'....- अंत्योदय अन्न योजना व...

 २.१२ लक्ष लाभार्थ्यांना गडचिरोली जिल्ह्यात मिळणार ‘आनंदाचा शिधा’….- अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांचा समावेश…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजनेतील व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना गुढीपाडवा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती  निमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्यात येत आहे.नियमित अन्नधान्याव्यतिरीक्त प्रति शिधापत्रिका १ किलो रवा, १ किलो चणादाळ,१ किलो साखर व १ लिटर पामतेल या ४ शिधाजिन्नसांचा समावेश असलेला ‘आनंदाचा शिधा’ (शिधाजिन्नस संच )रास्तभाव दुकानामार्फतीने सर्व पात्र शिधापत्रिकांना १०० रूपयांमध्ये वाटप करण्याचे‍ काम जिल्हयात सुरु झाले आहे. जिल्ह्यातील १२ तालुक्यात १,१९७ रास्त भाव दुकानांद्वारे ९८,६२२ अंतोदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारक व १,१३,४१९ प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना असे मिळून जिल्ह्यात २,१२,०४१ एवढ्या शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात येत आहे.

प्रति शिधापत्रिका १ किलो रवा,१ किलो चणादाळ, १ किलो साखर व १ लिटर पामतेल या ४ शिधाजिन्नसांचा समावेश असलेला आनंदाचा शिधा (शिधाजिन्नस संच) गडचिरोली तालुक्यातील मौजा चांदाळा येथील रास्तभाव दुकानात ३ एप्रिल रोजी दर्शन निकाळजे जिल्हा पुरवठा अधिकारी गडचिरोली, एस.एम.पतंगे पुरवठा निरीक्षक गडचिरोली व सचिन रामटेके अका-अन्न जिल्हा पुरवठा कार्यालय, गडचिरोली यांचे हस्ते शिधाजिन्नस किट वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विजांच्या कडकडाटासह पाऊस; अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात आज,शुक्रवार २६ जून रोजी विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.मात्र,विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काही तालुक्यात वीज कोसळून दुर्घटना...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थ्यांचे राष्ट्रपती भवनात केले स्वागत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- "मोठी स्वप्ने पाहा,शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा," असा प्रेरणादायी संदेश देत भारताच्या महामहिम राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोली...

डीआरआयची मोठी कारवाई; वन्यजीवांची आंतरराज्यीय तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय)प्रादेशिक युनिटने वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई करत आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात बेकायदेशीर वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश...

घरून निघाला ‘तो’ परतलाच नाही; ५९ वर्षीय इसम दहा दिवसांपासून बेपत्ता..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-शहराच्या श्रीनगर वार्डातील केस कटिंगचा (न्हावी)व्यवसाय करणारा ५९ वर्षीय इसम घरून दुकानात जाण्यासाठी निघाला तो अद्यापही घरी परतला नसल्याने कुटूंबीय चिंताग्रस्त...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!