- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-देशाची राजनीती लक्षात घेऊनच आरपीआय आपली राजकीय भुमिका ठरवीत असते,कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानाचे रक्षण करण्याची बांधिलकी रिपब्लिकन पक्षाची आहे.त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील राजकीय परिस्थितीला अनुसरून आरपीआय आपली भुमीका ठरवितो; अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन नागपूर प्रदेशाध्यक्ष प्रकाश कुंभे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा चंद्रपुरच्या कार्यकर्त्या मेळावा प्रसंगी केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा चंद्रपूर कार्यकर्ता मेळावा नागपूर प्रदेशाध्यक्ष प्रकाश कुंभे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.मेळाव्यात राज्य सचिव गोपाल रायपूरे,नागपूर प्रदेश सरचिटणिस सिद्धार्थ सुमन,राज्य सचिव अशोक उमरे,चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मोरेश्वर चंदनखेडे,गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नंदा रामटेके,विजय महेशगवळी नागपूर आदि प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.या प्रसंगी रिपाई नेते स्मृतिशेष नेताजी बुरचुंडे यांना पक्षातर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.त्यानंतर, गोपाल रायपूरे,सिद्धार्थ सुमन,अशोक उमरे,प्रा.मुनिश्वर बोरकर,नंदा रामटेके,बाजीराव उंदिरवाडे,अजय चव्हाण, संतोष रामटेके,गुरुदास रामटेके,प्रा.पियुष मेश्राम व अरुण देवघडे इत्यादींची समायोचित भाषणे झालीत. सदर मेळाव्याचे संचलन प्रा.रविंद्रनाथ पाटिल,प्रास्ताविक मोरेश्वर चंदनखेडे,तर उपस्थितांचे आभार संतोष रामटेके यांनी मानले.मेळाव्यास चंद्रपूर जिल्ह्यातील रिपाई कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
- Advertisement -

