भंडारा :-मोहाडी तालुक्यातील खडकी येथे ओवाळणी व मंडईनिमित्त गेलेल्या बहिणभावाचा शेतात असलेल्या खड्डयातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,सोमवार ११ नोव्हेंबर रोजी घडली.खडकी येथे काल,दिनांक-१० नोव्हेंबर रोजी मंडईचा कार्यक्रम होता.त्या निमित्त गोंदिया जिल्ह्यातील बोंडगाव येथील राजेंद्र वाढवे हे पत्नी व मुलांसह गेले होते.खडकी येथील मंडईचा कार्यक्रम आटोपल्यानंतर आज ११ नोव्हेंबर रोजी दुपारी १ च्या सुमारास वाढवे यांची मुलगी दिव्या वय १४ वर्षे,मुलगा प्रेम वय ९ वर्षे, प्रिन्सि योगेस्वर वरखडे वय १३ वर्षे रा.खडकी व अन्य मंडळी शेळ्या चारण्याकरिता शेतात गेले.दरम्यान,खडकी येथील ईश्वर ठवकर यांच्या शेतात मोठा खड्डा असून खड्यात भरपूर पाणी आहे.प्रेम हा आधी पाण्यात उतरला.तो बुडत असल्याचे बघून बहिण दिव्या हीसुद्धा त्याला वाचविण्यासाठी गेली.परंतु ती सुद्धा पाण्यात बुडाली. त्यांच्यासोबत असलेल्या प्रिन्सि वरखडे हिने तात्काळ गावात जाऊन याची माहिती दिली.गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेत पाण्यात उडी घेत शोधाशोध सुरू केली असता दिव्या व प्रेम यांना बाहेर काढले. त्यातील दिव्या हिला प्राथमिक आरोग्य केंद्र करडी येथे नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.त्याचप्रमाणे प्रेम याला भंडारा येथील शासकीय रुग्णालयात नेले असता त्यालाही मृत घोषित करण्यात आल्याने वाढवे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दुर्दैवी घटना… बहिण भावाचा शेतात असलेल्या खड्डयातील पाण्यात बुडून मृत्यू…
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

