- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-लाल चंदन बहुगुणी वृक्ष आहे.त्यापासून विविध कॉस्मेटिक प्रोडक्ट्स बनविले जातात.पुष्पा भाऊच्या दाक्षिणात्य चित्रपटाने लाल चंदन प्रसिद्धीच्या झोतात आले.लाल चंदनाच्या अनेक रंजक कथाही प्रसिद्ध झाल्या होत्या.या चंदनाची किंमत कोट्यवधीच्या घरात असल्याचे सांगण्यात येते.अशा बहुमूल्य लाल चंदनाचे वृक्ष ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात असल्याची माहिती पुढे आली आहे.एक नाही तर तब्बल तीन वृक्ष असल्याची माहिती मोहुर्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी दिली आहे.
ताडोबातील मोहुर्ली वनपरिक्षेत्रात वन विभागाचे विश्रामगृह परिसरातच लाल चंदनाचे वृक्ष उभे आहे. या तिन्ही झाडांची आम्ही योग्य पद्धतीने निगा राखतो अशीही माहिती त्यांनी दिली.ताडोबात अनेक वर्षांपासून लाल चंदनाचे वृक्ष आहे.अनेकांना याबाबत पुरेशी कल्पना नाही.अनेकांना तर ताडोबात लाल चंदनाचे वृक्ष आहे याचीही माहिती नाही.विशेष निगा राखण्यासाठी तेथे एक चबुतरा केला आहे; तसेच झाडावर त्याचे नाव देखील लिहिले आहे.
ताडोबाच्या जंगलात येणारे पर्यटक तसेच वन्यजीव अभ्यासक येथे लाल चंदन आहे काय? अशी विचारणा करतात,तसेच ताडोबात येणारा पर्यटक लाल चंदनाचा वृक्ष बघूनच ताडोबा प्रकल्पाच्या बाहेर पडतो. ताडोबातील वाघांचे जसे पर्यटकांना आकर्षण आहे तसेच आता लाल चंदनाचे झाडही आकर्षणाचा विषय बनला आहे.पुष्पा चित्रपटानंतर आता या वृक्षांना बघणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.
- Advertisement -

