Friday, June 19, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तविधानसभा सदस्यत्वाची महाविकास आघाडीच्या आमदारांनी घेतली शपथ..

विधानसभा सदस्यत्वाची महाविकास आघाडीच्या आमदारांनी घेतली शपथ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-विधानसभेचे विशेष अधिवेशन काल शनिवार पासून सुरू झाले आहे.काल शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह १७३ विधानसभा सदस्यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली होती.तर आज,रविवारी ८ डिसेंबरला विरोधीपक्षाच्या आणि महायुतीच्या उर्वरित आमदारांसह एकूण ११५ जणांचा शपथविधी पार पडणार आहे.विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी त्यांना शपथ दिली.यावेळी काँग्रेसच्या आमदारांनी संविधानाचे पुस्तक हातात घेत शपथ घेतली.
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शपथविधीपूर्वी महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक झाली.या बैठकीला आदित्य ठाकरे,विजय वडेट्टीवार,सुनील प्रभू, जितेंद्र आव्हाड, नितीन राऊत,नाना पटोले उपस्थित होते.बैठकीनंतर विरोधी पक्षाच्या सर्व आमदारांनी आज रविवारी शपथ घेतली.
दरम्यान,काल शनिवारी विरोधी पक्षाच्या आमदारांनी आमदारकीची शपथ घेतली नव्हती.विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी शपथ घेतल्यानंतर नाना पटोले यांचे नाव पुकारण्यात आले. त्यावेळी शपथ न घेता महाविकास आघाडीचे सदस्य सभागृहाबाहेर पडले होते.ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करीत विरोधी पक्षाच्या आमदारांनी शपथ न घेण्याचा निर्णय घेतला होता.भाजप आमदार राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष होणार आहेत.भाजपकडून राहुल नार्वेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.राहुल नार्वेकर यांनी आज रविवारी विधानसभा अध्यक्ष म्हणून पुन्हा अर्ज भरला आहे.राहुल नार्वेकर यांच्याकडे सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!