- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-एका २२ वर्षीय तरुणाचे १९ वर्षीय तरुणीशी सुत जुळले.सुत जुळल्यानंतर तब्बल तीन वर्षे दोघांनीही प्रेमाच्या आणाभाका घेतल्या.मागील तीन वर्षांपासून त्या दोघांमध्ये सुरू असलेल्या प्रेमप्रकरणामुळे अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित झाले.शारीरिक संबंध प्रस्थापित तर झालेच,पण प्रेमाच्या आणाभाका घेतलेल्या प्रियकराने चोरीछुपे प्रेयसीचे अश्लील व्हिडीओ बनविले.तो इतक्यावरच थांबला नाही,तर चक्क त्याने बनविलेले अश्लील व्हिडीओ सोशल मीडियाच्या इन्स्टाग्रामवर अपलोड करून तीन वर्षांपासून सुरू असलेल्या प्रेमाचा शेवट केल्याची घटना नुकतीच चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यात उघडकीस आली.प्रकरणी पीडित युवतीच्या तक्रारीवरून चिमूर तालुक्याच्या भिसी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.राकेश कैलास चौधरी वय २२ वर्षे,रा.वाढोणा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.आरोपी तरुणाने नुकतेच ९ ऑगस्ट रोजी पिडीत तरुणीचे बनविलेले अश्लील व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड केल्याने कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे.
- Advertisement -

