Wednesday, July 15, 2026
Homeकुरखेडालोखंडी सळाख वाहतूक करणारा ट्रक पलटी; ट्रकच्या केबिनमध्ये चालक तब्बल एक तास...

लोखंडी सळाख वाहतूक करणारा ट्रक पलटी; ट्रकच्या केबिनमध्ये चालक तब्बल एक तास अडकून.. -बुलडोजरच्या मदतीने काढण्याचा प्रयत्न; पहा व्हिडिओ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-लोखंडी सळाख भरून जाणाऱ्या ट्रकचा वाटेतच अचानकपणे टायर फुटल्याने ट्रक अनियंत्रित होऊन पुराडा-रामगड टी पॉइंटवरील वनविभागाच्या नाक्याजवळ पलटी झाल्याने ट्रकच्या केबिनमध्ये चालक तब्बल एक तास अडकून राहिला.पलटी होण्यापूर्वी मार्गावर कुणीही नसल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.मात्र,ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकास वाचविण्यासाठी यंत्रणांना मोठे शर्थीचे प्रयत्न करावे लागल्याची घटना काल,रविवारी दुपारच्या सुमारास घडली.राकेश लल्लन यादव वय ३५ वर्षे रा.बिजमोहनकटेरा जि.बलिया,उत्तर प्रदेश असे जखमी चालकाचे नाव असून तो एकटाच छत्तीसगड राज्याच्या रायपूरवरून तेलंगणाच्या हैदराबादकडे कोरची मार्गे सीजी ०४ पीवाय ०५४९ क्रमांकाच्या ट्रकमध्ये लोखंडी सळाख घेऊन वाहतूक करीत होता.अश्यातच कुरखेडा तालुक्याच्या पुराडा गावानजीक येताच रामगड टी-पॉइंटजवळ ट्रकचा एक टायर फुटला.टायर फुटताच वाहनात अवजड साहित्य असल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटून ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला.ट्रक उलटल्याची घटना नागरिकांच्या लक्षात येताच नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.त्यात ट्रकच्या केबिनमध्ये चालक अडकून पडल्याचे निदर्शनास येताच पुराडा पोलिसांना माहिती देण्यात आली.पोलीस प्रशासन व नागरिकांनी बुलडोजरच्या साहाय्याने ट्रक उभा करून तब्बल एक तासांनी चालकाला सुखरूप बाहेर काढून त्याला रुग्णालयात हलविले.
  • चालकास बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न👇
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!