Monday, September 7, 2026
Homeभंडारातब्बल १३ वर्षे सेवा बजावलेल्या शिक्षकाने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!

तब्बल १३ वर्षे सेवा बजावलेल्या शिक्षकाने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-मनमिळावू स्वभाव असलेल्या शिक्षकाने अचानकपणे टोकाचे पाऊल उचलत जंगलातील एका झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.रमेश शामराव पंचबुद्धे वय ४२ वर्षे रा.खुर्शीपार, ता.भंडारा असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव असून त्यांनी तब्बल १३ वर्षे सेवा बजावली होती.ते मानेगाव बाजार येथील चैतन्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे शिक्षक होते.
रमेश पंचबुद्धे हे काल सोमवारी सकाळच्या सुमारास शाळेत कर्तव्यावर न जाता भंडारा तालुक्याच्या रावणवाडी-धारगाव जंगल परिसरात गेले होते.त्यांच्या मनात काय घर करून सोडत होते,याची कल्पना कुणालाही आली नाही.अश्यातच दुपारी १ वाजेच्या सुमारास काही नागरिकांना रावणवाडीच्या जंगलात एका झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह दिसून आला.लागलीच सदरची माहिती अड्याळ पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी अड्याळ पोलिसांचे पथक दाखल होत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अड्याळ ग्रामीण रुग्णालयात पाठवला.रमेश पंचबुद्धे यांनी आत्महत्या कां केली,याचा शोध अड्याळ पोलिस प्रशासन करीत आहे.रमेश पंचबुद्धे यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली असा आप्त परिवार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!