Tuesday, September 8, 2026
Homeवर्धाडिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब लोकांना माहीत पडली तर..अशीच काहीशी घटना आज,बुधवार ३ जून रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील तरोडा ते बोथुडा मार्गावर घडली.टँकर पलटी झाल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक ग्रामस्थांनी डिझेल गोळा करण्यासाठी मिळेल त्या भांड्यासह घटनास्थळी धाव घेतली.लोकांनी चक्क ड्रम,बॅरेल,बादल्या आणि डबे घेऊन खाली सांडलेले डिझेल भरण्यासाठी एकमेकांवर तुटून पडले. टँकरमधून मोठ्या प्रमाणावर डिझेल बाहेर पडल्याने ते जवळच्या शेतात साचले होते,ते गोळा करण्यासाठी लोकांची मोठी झुंबड उडाली.डिझेलने भरलेला टँकर आज सकाळी समुद्रपूरच्या दिशेने जात असतांना अचानकपणे वाहनाचे टायर फुटले आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.दरम्यान,टँकर महामार्गाच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन पलटी झाला.सुदैवाने दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.मात्र, परिसरातील नागरिकांनी काहीकाळ डिझेल नेण्याचा सपाटा लावला.घटनेची माहिती मिळताच हिंगणघाट पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर नागरिकांनी डिझेल नेणे बंद केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

शालेय शिक्षण मंत्री गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर.. – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा घेणार आढावा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे उद्या,बुधवार ९ सप्टेंबर व १० सप्टेंबर २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,या दौऱ्यात...

मोबाईल व्यसनातून मुक्तीचा जागर-विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन.. – नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-मोबाईलचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे व्यसन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या शारीरिक,मानसिक व सामाजिक विकासावर परिणाम करू शकते.या पार्श्वभूमीवर आज,मंगळवार ८...

चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाचा गडचिरोली जिल्ह्यात खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातून एक खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे.  एका ३४ वर्षीय तरुणाच्या डोक्यात अज्ञाताने तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!