उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :- मातीमिश्रित परवानाच्या नावाखाली दर्जेदार रेतीचा उपसा हे प्रकरण जिल्ह्यात चांगलेच गाजत आहे. उल्लेखनीय म्हणजे लाखांदूर तालुक्यात परवाना एकाचा ट्रॅक्टर दुसऱ्याचे तर यात अधिकाऱ्यांची चांदी होत आहे.मलाई लाटण्यासाठी बांधलेली चॅनेल उघडपणे आपले काम करीत आहे.
भंडारा जिल्ह्याला वैनगंगासह तिच्या उपनद्यांमध्ये रेतीचे वरदान लाभले आहे.रेती घाटांची लिलाव प्रक्रिया अजूनही प्रथम टप्प्यातही पोहोचलेली नाही. नाही. जिल्ह्यातील ५४ पेक्षा जास्त रेतीघाटांचे लिलाव झाले नाही. त्यातच आता मातीमिश्रित रेती वाहतुकीच्या नावावर रेती तस्करीचे गौडबंगाल केले जात आहे.चांगलेच मलाईचे साधन असल्याने अधिकाऱ्यांवर पैशांची बरसात केली जात नसावी तर नवलच! अशीही चर्चालाखांदूर असो की पवनी, मोहाडी की तुमसर, महसूल प्रशासनाच्या संगनमताशिवाय कुठलेही गैरकृत्य होत नसल्याचे बोलके चित्र आहे.पवनी तालुक्यातील इटगाव रेतीघाटाचीही हीच अवस्था आहे.खुद्द लाखांदूर तालुक्यात रेती तस्करीचा गोरखधंदा फुलत असताना जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष कसे काय? हा मोठा यक्ष प्रश्न आहे. गौण खनिजाची काळी कमाई वाटून खाल्ली जात आहे.