उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
देसाईगंज :- शहरातील जुनी वडसा वार्ड कमलानगर येथील विद्युत पोल क्रमांक बी -१४५ या विद्युत पोल वरील तारे खाल पर्यंत लांबलेली आहेत.तसेच सदर विद्युत पोलची अतिशय बिकट अवस्था झालेली असल्याने भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो; तारे खाल पर्यंत लोम्ब्लेलि असल्याने रस्त्याने आवागमन करणाऱ्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आह़े.पुढच्या महिन्यांपासून पावसाळा सुरू होत आह़े.तरी याकडे जातीने लक्ष देऊन सदर पोल त्वरित बदलवून नवीन पोलची व्यवस्था करण्यात यावी.तसेच या पोल वरील तारेचि दुरुस्ती करण्यात यावी; या मागण्यांचे निवेदन आज २३ मे रोजी समाजवादी पार्टी देसाईगंज शहरच्या वतीने विद्युत वितरण कंपनीचे शाखा अभियंता देसाईगंज यांना देण्यात आले.
निवेदन सादर करतेवेळी सपाचे तालुका अध्यक्ष खेमराज नेवारे,शहराध्यक्ष नरेश वासनिक,तुषार कावळे,तुषार रहाटे,वैभव चिंचकार आणि बहुसंख्य समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.