Tuesday, September 22, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यास शासन दाखवतोय ठेंगा...'गडचिरोली जिल्हा व भातावर भिल्ला'- आम आदमी पक्षाचे...

गडचिरोली जिल्ह्यास शासन दाखवतोय ठेंगा…’गडचिरोली जिल्हा व भातावर भिल्ला’- आम आदमी पक्षाचे गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश जीवनी 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके

गडचिरोली :- गडचिरोली जिल्हा आदिवासी,बहुल, अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून जिल्ह्याची ओळख आहे.स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव मोठ्या गाजावाज्याने जरी साजरा केला जात असला तरी पोमडेंगी फेकणाऱ्या इतरांसाठी ठीक आहे.मात्र ‘गडचिरोली जिल्हा व भातावर भिल्ला’असे हल्ली चित्र निर्माण झाले असल्याचे जीवानी यांनी म्हटले आहे.

हे खालील प्रकारावरून निदर्शनास दिसून येत आहे.

आम आदमी पक्षाचे प्रकाश जीवनी यांच्या मतानुसार गडचिरोली जिल्ह्यास शासनाचा ठेंगा.. 👇

१) गडचिरोली ते वडसा रेल्वेस शासनाचा  ठेंगा…

२) लोहप्रकल्प किंवा कोणतेही मोठे उद्योगास ठेंगा…

३) मेडिकल कॉलेजास ठेंगा …

४) जिल्ह्यात लोह खनिज पदार्थांची इतरत्र वाहतूक थांबविण्यास ठेंगा…

५) वडसा शहराला बस डेपोस ठेंगा…

६) वडसा एम आय डी सी स ठेंगा…

 ७) वडसा मध्ये पार्किंग झोनला ठेंगा…

 ८) शहरला आरोग्य सुविधांस ठेंगा…

९) किसान भवणास ठेंगा….

 १०) रेल्वे अंडर ब्रिज नापास…पाणी साठल्यास ठेंगा..

११) शहराला बायपास देण्यास ठेंगा…

१२) शेतकऱ्यांच्या समस्यास ठेंगा…. टेबलाच्या वरून काम करण्यास ठेंगा….

सदर संपूर्ण प्रकरणांमध्ये असे वाटतेय की गडचिरोली जिल्ह्यात उंटा वरून शेळ्या हाकलण्याचे काम….नुकसानीचे सर्वे होऊन मदत शुन्य…उद्योग नाही..विकास नाही…कार्य शून्य..फक्त सुरुवातीला गडचिरोली जिल्ह्यात पदभार सांभाळण्यास अनेकजण घाबरतात; मात्र जिल्ह्यात काही कालावधी वास्तव्य करताच चाटून-पुसून व धुवून टाकून पोबारा करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अशा कार्यकर्त्यांमुळेच जिल्ह्याचा विकास खुंटला असल्याचे आम आदमी पक्षाचे गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश जीवनी यांनी म्हटले आहे.यावर त्वरित आळा घातला जावा; अन्यथा गडचिरोली जिल्ह्यात संपूर्ण ठिकाणी आम आदमी पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे जीवनी यांनी म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

आता देसाईगंज तालुक्याच्या ग्रामपंचायतींमध्ये भ्रष्टाचाराचा कळस..!

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-नुकतेच गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यांची आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आलीत. सार्वजनिक निधीचा अपहार करणे आणि शासकीय योजनांमध्ये...

‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत गणेश मंडळांमध्ये शासकीय योजनांची जनजागृती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय,गडचिरोलीमार्फत विविध गणेश मंडळांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!