Sunday, August 30, 2026
Homeबुलढाणाहृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही...

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या पायथ्याशी वसलेल्या भालांजन गावाशेजारील राजुरा धरण परिसरात असलेल्या विहिरीत एकाच वेळी पाच जणांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली. स्थानिक नागरिकांना विहिरीत पाच जणांचे मृतदेह तरंगताना आढळल्याने त्यांनी त्याची माहिती जळगाव जामोद पोलिसांना दिली.त्यानंतर,जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन पाटील पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल होऊन विहिरीतून पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढल्यानंतर मृतांची ओळख पटली.यात वडील,दोन मुले व दोन मुलींचा समावेश आहे.विजय मुसा किराडिया वय २७ वर्षे(वडील),प्रित किराडिया वय ८ वर्षे(मुलगा),प्राची किराडिया वय ६ वर्षे,पूर्वी किराडिया वय ४ वर्षे(मुली व पियुष किराडिया वय २ वर्षे(मुलगा)अशी मृतांची नावे असून सर्वजण जळगाव जामोद तालुक्याच्या राजुरा ग्रामपंचायत उमापुर(भालांजन)गावातील रहिवासी आहेत.
विजय किराडियाचे त्याच्या पत्नीशी भांडण झाले होते.भांडण झाल्याने पत्नी चारही मुलांना घरीच सोडून इस्लामपूर येथील आपल्या माहेरी निघून गेली होती.त्यामुळे विजय आज सकाळी स्वतः घरचे काम करत होता.यावेळी त्याच्या वडिलांनी तू काम का करत आहेस?तुझी बायको कुठे गेली? असा प्रश्न केला.त्यातून झालेल्या वादातून विजय किराडिया याने आपल्या चारही मुलांना राजुरा धरण परिसरात नेत  विहिरीत ढकलून स्वतःही आत्महत्या केली.पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जामोदचे ठाणेदार नितीन पाटील तथा पोलीस पथक करीत आहेत.एकाच कुटुंबातील पाच जणांचा अशा पद्धतीने अंत झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.तब्बल पाच जणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप स्पष्ट झाले नाही; पण हृदय पिळवटून टाकणारी ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!