Wednesday, August 5, 2026
Homeबुलढाणाऐन होळी सणाच्या दिवशीच युवा शेतकऱ्याची आत्महत्या..

ऐन होळी सणाच्या दिवशीच युवा शेतकऱ्याची आत्महत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
बुलढाणा :-ऐन होळी सणाच्या दिवशीच एका युवा शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज,गुरुवारी १३ मार्च रोजी सकाळच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथे उघडकीस आली आहे.कैलास अर्जुन नागरे वय ३८ वर्षे,रा.शिवनी आरमाळ,ता.देऊळगाव राजा,जि.बुलढाणा असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.सदर शेतकऱ्यास राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार मिळालेला होता.आत्महत्येपूर्वी शेतकऱ्याने शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळत नसल्यामुळे शासनाच्या निषेधार्थ आपण हे पाऊल उचलत असल्याचे लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे.कैलास नागरे हे एक प्रगतीशील शेतकरी होते. त्यांना राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला होता. त्यांनी आज होळीच्या दिवशीच शेतकऱ्यांसाठी आत्महत्या केल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.कैलास नागरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक तीन ते चार पानी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे.त्यात त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नसल्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे.बुलढाण्याचे पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांनी याची पुष्टी केली आहे. कैलास नागरे गत अनेक दिवसांपासून देऊळगाव राजा परिसरातील शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळावे यासाठी लढा पुकारला होता.गत डिसेंबर महिन्यात त्यांनी दहा दिवसांचे अन्नत्याग आंदोलनही केले होते.पण प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते.अखेर नागरे यांनी आज टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..!अंतिम संस्काराची तयारी सुरू असतांनाच मृतक व्यक्तीने उघडले डोळे..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्यात एक अचंभित करणारी घटना काल मंगळवारी उघडकीस आली.एका ४० वर्षीय व्यक्तीची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल...

ऑगस्ट महिन्यापासून गॅस कनेक्शनची ई-केवायसी असणे बंधनकारक; अन्यथा कनेक्शन होणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त :-गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि साठेबाजी उघड करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्या इंडेन, एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांसाठी स्वयंपाकाच्या...

आता बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे जातवैधता प्रमाणपत्र तयार करणे पडणार महागात..

उद्रेक न्युज वृत्त :-बरेचदा जातवैधता प्रमाणपत्र अर्थात कॉस्ट व्यालीडिटी सर्टिफिकेट बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनवून शासकीय योजनांचा लाभ मिळवणे,शासकीय नोकरी,अभियांत्रिकी प्रवेश व इतर...

महामार्गाच्या विस्तारासाठी सरकारने शेतकऱ्यांना भूमिहीन करू नये- विजय वडेट्टीवार

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार भंडारा,गोंदिया,गडचिरोली आणि चंद्रपूरपर्यंत करण्यासाठी सुरू असलेल्या भूसंपादनात व सुपिक जमीन घेण्यासाठी प्रशासनाकडून बळजबरी केली जात असल्याचा आरोप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!