Wednesday, August 5, 2026
Homeनागपूरअज्ञात चोरट्यांचा ११ लाख ४० हजारावर डल्ला; डोळ्यात फेकली मिरची पावडर..

अज्ञात चोरट्यांचा ११ लाख ४० हजारावर डल्ला; डोळ्यात फेकली मिरची पावडर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-एका दुकान मालकाकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याच्याकडील ११ लाख ४० हजारावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला घातल्याचा प्रकार नागपूरच्या लकडगंज परिसरातील घास बाजार रोडवरील हिंदुस्तान शाळेजवळ काल बुधवारी उघडकीस आला.कर्मचारी हा रोकड घेऊन बँकेत जमा करण्यासाठी निघाला असतांना सदर घटना घडली. घटनेची माहिती होताच पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल,परिमंडळ क्रमांक ३ च्या पोलीस उपायुक्त महक स्वामी,सहाय्यक पोलीस आयुक्त श्वेता खाडे,वरीष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत जी.चांदेवार, सहायक पोलीस निरीक्षक यशवंत किचक,लकडगंज पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक नयना माहुलकर यांनी घटनास्थळी भेट दिली.मात्र,अज्ञात चोरट्यांचा रात्रीपर्यंत धांगपत्ता लागलेला नाही.
शेख मुजफ्फर उर्फ गुड्डू वय ४८ वर्षे,रा.टिमकी पोलीस चौकीजवळ हा तीननल चौकातील प्रतवी मेटलचे (लोहा)मालक किरण चिंचललापुरे यांच्याकडे काम करतो.तो दुकानातील ११ लाख ४० हजारांची रोकड एका काळ्या रंगाच्या पिशवीत टाकून सीएच्या टेलिफोन एक्सचेंज चौकतील एचडीएफसी बँकेमध्ये जमा करण्याकरीता त्याच्या स्कूटरवरुन जात होता. अशातच घास बाजार रोडवरील हिंदुस्तान शाळेजवळ एका काळ्या रंगाच्या स्कूटरवून आलेल्या तीन अज्ञातांनी पाठीमागून येऊन त्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली.त्यातच मारहाण करून,शस्त्राचा धाक दाखवून रोकड असलेली काळ्या रंगाची पिशवी जबरदस्तीने घेऊन पसार झाले.घटनेची माहिती मिळताच मालक किरण चिंचललापुरे यांनी घटनेबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली.पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली असून आरोपींचा कसून शोध घेत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..!अंतिम संस्काराची तयारी सुरू असतांनाच मृतक व्यक्तीने उघडले डोळे..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्यात एक अचंभित करणारी घटना काल मंगळवारी उघडकीस आली.एका ४० वर्षीय व्यक्तीची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल...

ऑगस्ट महिन्यापासून गॅस कनेक्शनची ई-केवायसी असणे बंधनकारक; अन्यथा कनेक्शन होणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त :-गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि साठेबाजी उघड करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्या इंडेन, एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांसाठी स्वयंपाकाच्या...

आता बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे जातवैधता प्रमाणपत्र तयार करणे पडणार महागात..

उद्रेक न्युज वृत्त :-बरेचदा जातवैधता प्रमाणपत्र अर्थात कॉस्ट व्यालीडिटी सर्टिफिकेट बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनवून शासकीय योजनांचा लाभ मिळवणे,शासकीय नोकरी,अभियांत्रिकी प्रवेश व इतर...

महामार्गाच्या विस्तारासाठी सरकारने शेतकऱ्यांना भूमिहीन करू नये- विजय वडेट्टीवार

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार भंडारा,गोंदिया,गडचिरोली आणि चंद्रपूरपर्यंत करण्यासाठी सुरू असलेल्या भूसंपादनात व सुपिक जमीन घेण्यासाठी प्रशासनाकडून बळजबरी केली जात असल्याचा आरोप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!