Tuesday, July 28, 2026
Homeबुलढाणागुरुजींनीच फोडला बारावीचा पेपर; प्रत्येकी १२ हजाराची डील- ९९ जणांचा केला गृप...

गुरुजींनीच फोडला बारावीचा पेपर; प्रत्येकी १२ हजाराची डील- ९९ जणांचा केला गृप तयार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

बुलढाणा :- सध्या राज्यात दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत.यंदाच्या बोर्डाच्या परीक्षेत कॉपी मुक्त अभियान राबवण्याकडे शिक्षण विभागाने भर दिला आहे.मात्र बुलढाण्यात शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. सातत्याने बारावीच्या पेपरात गंभीर चुका होत असल्याचे समोर येत असताना बुलढाण्यात गणिताचा पेपर सुरू होण्याआधीच फुटला आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

पेपर फुटी प्रकरणामध्ये दोन शिक्षकांना अटक केली आहे.शिक्षकांनी व्हॉट्सअप ग्रुप बनवून पेपर व्हायरल केला असल्याचे समोर आले आहे.ग्रुपमध्ये एकूण ९९ जणांचा समावेश होता.पास करून देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १० ते १२ हजार रुपये घेतले जात असल्याची माहितीही समोर आली आहे.परीक्षेत गैर प्रकार करण्यासाठी कट रचला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

दोन दिवसांपूर्वी बारावीच्या गणिताचा पेपर सुरू होणार होता; मात्र त्याआधीच सिंदखेड राजा तालुक्यात साडेदहा वाजता सोशल मीडियावर गणिताचा पेपर येऊन धडकला.गणिताचा पेपर फुटला असल्याची बोंब पेपर सुरू होण्या आधीच उठली. त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण पसरले होते.बारावीच्या परीक्षेत शिक्षण विभागाच्या सातत्याने चुका समोर येत आहेत.त्यामुळे माध्यमिक शिक्षण विभाग उच्च माध्यमिक शिक्षण विभाग बारावीच्या परीक्षा घेताना किती जबाबदारीने वागतात ते सिद्ध होत आहे.बुलढाण्यात पेपर सुरू होण्याआधीच पेपर फुटला.अशा सातत्याने होणाऱ्या चुकांना नेमके जबाबदार कोण? असा प्रश्न पडला  आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत विविध जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्याने कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी...

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!