उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :- जिल्ह्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी २२ नोव्हेंबर २०२२ रोजी भंडारा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी पदभार स्वीकारल्यानंतर सर्वांना ठणकावून सांगितले की,कामात कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही; असे सक्त आदेश त्यांनी रूजू होताच दिले होते.मात्र काहीजण ‘चलती का नाम गाडी’ असे करून आम्ही आमचे स्वतःच मालक असल्याचे भासवित असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी अशांवर फटाके फोडले आहेत.त्यानुसार भंडारा खनिकर्म विभागात कार्यरत दोन कर्मचाऱ्यांनी गौण खनिजाची रॉयल्टी देण्याच्या कामात कसूर केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी दोन कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाची नोटीस देऊन निलंबित केले आहे.नोटीस दिलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये विशाल गुल्हाने आणि उमेश बारापात्रे यांचा समावेश आहे.
तसेच कामात हयगय केल्याप्रकरणी आतापर्यंत १० च्या वर कर्मचाऱ्यांना नोटीस देऊन निलंबनाची कारवाई झाली आहे.पोलिस पाटील भरती अनियमिततेप्रकरणी तत्कालीन भंडारा उपविभागीय अधिकाऱ्यांसह दोन तहसीलदार निलंबित झाले होते. या अधिकाऱ्यांचे निलंबन कारवाई जिल्हाधिकारी यांच्या अहवालावरच झाली होती.आता हे दोन कर्मचारी निलंबित झाले असून या यादीत आणखी काही कर्मचाऱ्यांचा नंबर लागणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात सर्वत्र सुरू आहे.यावरून असे लक्षात येते की,तुम्ही कुठल्याही पदावर असा; मात्र तुम्ही आहात तर जनतेचे लोकसेवकच; तुम्ही आम जनतेसाठी कुठल्याही प्रकारचे साहेब नाहीत.मात्र काहीजण सर्व काही विसरून ‘मी बडा..मी बडा..असे दाखवून आम जनतेची दिशाभूल करतांना दिसून येत आहेत.मात्र भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर याला अपवाद असल्याचे दिसून येत आहेत.त्यांचा आदर्श इतरांनी घेणे आवश्यक आहे.नाहीतर काहीजण ‘चोरांचे साथीदार आणि चल मेरे घोडीदार’अशी चोर घोड्यांची अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही.एखादा निर्णय घ्यायचा म्हटला तर अरे..तो आपल्या बिरादरीचा आहे; आपल्या क्षेत्रातील आहे; बघू काय आहे तर…असे चोर घोडे करून हात झटकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा हल्ली प्रकार निदर्शनास येऊ लागला आहे.अशांवर त्वरित आळा घातला पाहिजे; अन्यथा केवळ देखावा करून ‘चल मेरे साथी’ असे करून आम जनतेला चुना लावल्याशिवाय राहणार नाहीत.