उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- छत्रपती शिवाजी क्लब देसाईगंजच्या वतीने काल १९ फेब्रुवारीला शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून आज पुन्हा दोन दिवसीय कार्यक्रम प्रसंगी २० फेब्रुवारी ला सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास राजेंद्र वार्ड देसाईगंजच्या समाज भवनाच्या आवारात शिवाजी महाराज जयंती निमीत्त भव्य समाज प्रबोधन व सामूहिक भोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याने सदर कार्यक्रमास जास्तीत जास्ती जनतेंनी,शिवसैनिकांनी सहपरिवारासह उपस्थित राहण्याचे आवाहन छत्रपती शिवाजी क्लबचे अध्यक्ष तथा व ओबीसी समाज संघटनेचे शहराध्यक्ष सागरभाऊ वाढई यांच्या वतीने करण्यात आले आहे.
शिवाजी महाराज जयंती निमित्ताने देसाईगंज नगरीत काल १९ फेब्रुवारी ला शिवरायांची पालखी व भव्य-दिव्य मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील संस्कृतीचा वारसा असलेले आदिवासी नृत्य व विशेष आकर्षण म्हणून शिवकालीन आखाडा ज्यामध्ये,लाठी काठी,तलवार बाजी,दांडपट्टा,आगीचे खेळ,तायक्वांदो आणि छत्रपती शिवाजी क्लबच्या सदस्यांचे लेझीम पथक सादर करण्यात आले.

गेली ९ वर्षांपासून छत्रपती शिवाजी क्लब सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य,सांस्कृतिक आणि पर्यावरण पूरक क्षेत्रात काम करीत आहे.महापुरुषांचा वारसा पुढे घेऊन जाणे आणि महापुरुषांचे विचारधारेवर कार्य करून समता,स्वतंत्रता,बंधुता आणि न्यायावर आधारीत राष्ट्र समाज निर्माण करणे; हे छत्रपती शिवाजी क्लबचे उद्दिष्ट असल्याने गरजू रुग्णांना तात्काळ रक्त उपलब्ध करून देणे.छत्रपती शिवाजी क्लब देसाईगंजच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षापासून होत आहे.कोरोना काळात गरजू व गरीब मुलांना मोफत शिक्षणाचे धडे देण्यात आले.ज्या माध्यमातून देसाईगंज शहराच्या प्रत्येक वार्डात मोफत ट्युशन क्लासेस सुरू करण्यात आली.प्रत्येक वर्षी एक झाड स्वतःसाठी हे उपक्रम राबवण्यात येते.ज्यामध्ये वृक्षारोपणाचा अभियान घेण्यात येत असतो.
दरवर्षी शिवजयंती महोत्सवाचे आयोजन छत्रपती शिवाजी क्लबच्या माध्यमातून केले जाते.छत्रपती शिवाजी क्लबचे अध्यक्ष तथा व ओबीसी समाज संघटनेचे शहराध्यक्ष सागरभाऊ वाढई यांच्या नेतृत्वात शिवजयंती महोत्सव साजरा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.जयंती साजरी करतेवेळी अमोल मिसार,गौरव शेलार, शैलेश येलगंदवार,मोहन बागडे,सुरज मिसार,मोरू मोहूर्ले,निशिकांत वाढई,योगेश कुंभरे,रोहन प्रधान, विलास चौधरी,वैभव शिलार,वैभव बागडे,ओम पोहनकर,सुशांत नाकतोडे,रोशन कवासे,विनय उईके, संतोष वाडनकर सर्वांचे सहकार्य लाभले.
पुढील कार्यकाळात उत्कृष्ठरित्या शिवजयंती साजरी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावे; असे आवाहन छत्रपती शिवाजी क्लबचे अध्यक्ष सागर भाऊ वाढई यांनी केले आहे.