- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या मौजा-चोप येथे सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने यंदाही भव्य दुर्गा उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.गांधी चौक येथे येत्या २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर २०२५ दरम्यान हा उत्सव भक्तीमय वातावरणात पार पडणार आहे.धार्मिक कार्यक्रमांसोबत सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांची मेजवानी या काळात अनुभवायला मिळणार आहे.
गरबा स्पर्धा👇
२४ व २५ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता रंगणाऱ्या गरबा स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.प्रथम क्रमांक विजेत्यास रु. १०,००१/-, द्वितीय क्रमांकासाठी रु.७,००१/- तर तृतीय क्रमांकासाठी रु.४,००१/- अशी पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.या स्पर्धेला स्थानिक तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.
भजन स्पर्धा👇
२७ आणि २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या भजन स्पर्धेलाही विशेष उत्साह आहे.भक्तिगीतांच्या माध्यमातून अनेक मंडळे आपले कलागुण सादर करणार आहेत.या स्पर्धेतही प्रथम क्रमांक विजेत्यास रु.१०,००१/- चे बक्षीस मिळणार असून इतर पारितोषिके देखील ठेवण्यात आली आहेत.
सामाजिक उपक्रम👇
फक्त धार्मिक आणि सांस्कृतिकच नव्हे तर सामाजिक उपक्रमांनाही या उत्सवात तितकेच महत्त्व देण्यात आले आहे.३० सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.समाजहितासाठी हा उपक्रम विशेष ठरणार आहे.
विशेष आकर्षण- शिव तांडव👇
३० सप्टेंबर रोजी युवा महाकाल की झांकी,उज्जैन (मध्यप्रदेश)यांचे शिव तांडव सादरीकरण होणार आहे. यावेळी भक्तांना अद्वितीय आध्यात्मिक अनुभूती मिळणार असून,हा कार्यक्रम उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.
आयोजक- सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ,गांधी चौक,चोप.
📞 संपर्क–8999161652,
70306 26884,
84590 63045
- Advertisement -

