Tuesday, September 1, 2026
Homeकुरखेडादुचाकी अपघातात एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी.. - कुरखेडाच्या गेवर्धा मार्गावरील...

दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी.. – कुरखेडाच्या गेवर्धा मार्गावरील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या गेवर्धा मार्गावरील को-ऑपरेटिव्ह बँकेच्या समोर दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर धडक होऊन एका दुचाकी चालकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुसऱ्या दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाल्याने त्यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचाराकरिता हलविण्यात आले आहे.सदरची घटना आज,बुधवार १७ सप्टेंबर रोजी सकाळी पावणे बाराच्या सुमारास घडली.चरणदास गोमा उसेंडी वय ५८ वर्षे रा.भगवानपूर,ता.कुरखेडा, जि.गडचिरोली असे अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.तर १८ वर्षीय प्रीतम ईश्वर नैताम रा.कोसी,ता.कुरखेडा व जनाबाई नैताम वय ६९ वर्षे,रा.रावणवाडी असे गंभीर जखमी दोघांची नावे आहेत.
माहितीनुसार,प्रीतम व जनाबाई हे दुचाकीने गुरनोली-अरततोंडीकडे जाण्यासाठी निघाले होते.तर एमएच ३३ डी ९३०१ क्रमांकाच्या दुचाकीने चरणदास उसेंडी हे कुरखेडा वरून गेवर्धामार्गे येत असतांनाच मुख्य मार्गाच्या बाजूला असलेल्या को-ऑपरेटिव्ह बँकेच्या समोर दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक बसली. यात तिघेही खाली कोसळले.धडक भीषण असल्याने तिघांनाही जोरदार मार लागला.लागलीच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तिघांनाही तात्काळ कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.उपचार सुरू असतांनाच चरणदास उसेंडी यांचा मृत्यू झाला.तर गंभीर जखमी दोघांना गडचिरोली रेफर करण्यात आले.घटनेची माहिती कुरखेडा पोलिसांना मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!