Wednesday, July 15, 2026
Homeनागपूर११ वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा अपहरण करून खून; तीन आरोपी अटकेत..

११ वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा अपहरण करून खून; तीन आरोपी अटकेत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका ११ वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा अपहरण करून खून झाल्याची घटना आज,बुधवार १७ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास नागपूर जिल्ह्याच्या खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.जित युगराज सोनेकर वय ११ वर्षे,रा.चनकापुर,ता.सावनेर,जि.नागपूर असे खून झालेल्या चिमुकल्याचे नाव असून तो शंकरराव चव्हान इंग्लीश मीडीयम शाळा,प्रकाशनगर,खापरखेडा येथे सहाव्या वर्गात शिकत होता.प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.चनकापुर येथील रहिवासी असलेले राहुल गौरीलाल पाल वय २५ वर्षे,अरूण बैचु भारती वय २५ वर्षे व यश गिरीश वर्मा वय २१ वर्षे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
११ वर्षीय जित हा नेहमीप्रमाणे सोमवार १५ सप्टेंबर २०२५ रोजी शाळेत जाण्यासाठी निघाला होता.त्या दिवशी मुलगा घरी परतला नसल्याने कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली.सायंकाळ होऊन रात्रही झाली,तरी मुलगा शाळेतून घरी कां आला नाही म्हणून कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली.शोधाशोध करुनही मुलगा सापडला नसल्याने आई नीलीमा युगराज सोनेकर वय ३५ वर्षे, चनकापुर,ता.सावनेर यांनी खापरखेडा पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली होती.त्यानुसार पोलिसांनी सर्वप्रथम ओळखीचे नातेवाईक,मित्र,शाळेतील शिक्षक यांच्याकडून माहिती घेत शोध सुरू केला.अखेर आज बुधवारी चनकापूर कॉलनी शिवारातील झुडुपात एका मुलाचा मृतदेह आढळल्याची माहिती खापरखेडा पोलिसांना मिळाली.पोलिसांनी घटनास्थळ गाठुन चौकशी केली असता तो जित सोनेकर असल्याची ओळख पटली.त्यानुसार पोलिसांनी परिसरातील संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासले असता भानेगाव बसस्थानक परिसरात असतांनाच आरोपींनी  अरूण भारतीच्या कारमध्ये डांबून जितचे अपहरण केले होते. पोलीस मागावर असल्याची भनक आरोपींना होताच त्यांनी जितचा गळा दाबून हत्या केल्याची कबुली दिली. आरोपींनी चिमुकल्याचे अपहरण खंडणीसाठी केले असावे,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!