Wednesday, September 2, 2026
Homeदेसाईगंजचोप येथे दुर्गा उत्सवाची जय्यत तयारी; सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल.. -...

चोप येथे दुर्गा उत्सवाची जय्यत तयारी; सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल.. – यंदाही असणार गरबा,भजन स्पर्धा,रक्तदान शिबिर आणि शिव तांडवचे विशेष आकर्षण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या मौजा-चोप येथे सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने यंदाही भव्य दुर्गा उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.गांधी चौक येथे येत्या २२ सप्टेंबर ते  २ ऑक्टोंबर २०२५ दरम्यान हा उत्सव भक्तीमय वातावरणात पार पडणार आहे.धार्मिक कार्यक्रमांसोबत सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांची मेजवानी या काळात अनुभवायला मिळणार आहे.
गरबा स्पर्धा👇
२४ व २५ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता रंगणाऱ्या गरबा स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.प्रथम क्रमांक विजेत्यास रु. १०,००१/-, द्वितीय क्रमांकासाठी रु.७,००१/- तर तृतीय क्रमांकासाठी रु.४,००१/- अशी पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.या स्पर्धेला स्थानिक तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.
 भजन स्पर्धा👇
२७ आणि २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या भजन स्पर्धेलाही विशेष उत्साह आहे.भक्तिगीतांच्या माध्यमातून अनेक मंडळे आपले कलागुण सादर करणार आहेत.या स्पर्धेतही प्रथम क्रमांक विजेत्यास रु.१०,००१/- चे बक्षीस मिळणार असून इतर पारितोषिके देखील ठेवण्यात आली आहेत.
सामाजिक उपक्रम👇
फक्त धार्मिक आणि सांस्कृतिकच नव्हे तर सामाजिक उपक्रमांनाही या उत्सवात तितकेच महत्त्व देण्यात आले आहे.३० सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.समाजहितासाठी हा उपक्रम विशेष ठरणार आहे.
विशेष आकर्षण- शिव तांडव👇
३० सप्टेंबर रोजी युवा महाकाल की झांकी,उज्जैन (मध्यप्रदेश)यांचे शिव तांडव सादरीकरण होणार आहे. यावेळी भक्तांना अद्वितीय आध्यात्मिक अनुभूती मिळणार असून,हा कार्यक्रम उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.
आयोजक- सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ,गांधी चौक,चोप.
📞 संपर्क–8999161652,
70306 26884,
84590 63045
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!