Tuesday, July 21, 2026
Homeमुंबईचार महिन्याच्या मुलीची हुद्द बापानेच पाळण्याच्या दोरीने गळा आवळून केली हत्या..

चार महिन्याच्या मुलीची हुद्द बापानेच पाळण्याच्या दोरीने गळा आवळून केली हत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-अवघ्या चार महिन्याच्या मुलीची हुद्द बापानेच पाळण्याच्या दोरीने गळा आवळून हत्या केल्याची घटना काल शनिवारी मुंबईच्या घाटकोपर कामराज नगरमध्ये घडली.याप्रकरणी आरोपी पालक संजय कोकरे याला पंतनगर पोलिसांनी अटक केली आहे.
अधिक माहिती अशी की,कोकरे यांना अगोदरच दोन मुली आहेत.त्यातच तिसरीही मुलगी झाल्याने बापाचा राग अनावर झाला.घटनेच्या वेळी चिमुकलीची आई ही कामानिमित्त बाहेर गेली होती तर मुलगी पाळण्यात झोपलेली होती.तेवढ्यात संजय कोकरे याने निष्पाप, निरागस चिमुकलीचा मुलगी ज्या पाळण्यात झोपली होती,त्याच पाळण्याच्या दोरीने तिचा गळा आवळला. काही वेळाने जेव्हा मुलीची आई घरी आली,तेव्हा तिला चिमुकली काहीही हालचाल करीत नसल्याचे लक्षात येताच सदरची घटना उघडकीस आली.आपले मुल गेल्याचे पाहताच आई बेशुध्द पडली.घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पंतनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी संजय कोकरे यांस अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!