- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-दहावीच्या इंग्रजी विषयाचा पेपर देण्यापूर्वीच एका विद्यार्थ्याने अभ्यास न झाल्याने परीक्षेत उत्तीर्ण न होण्याची मनात भीती बाळगून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असल्याची घटना काल शनिवारी १ मार्चला सकाळी नागपूर जिल्ह्याच्या कुही बसस्थानकावर उघडकीस आली.
आर्यन विजय लुटे वय १७ वर्षे,रा.आकोली,ता.कुही, जि.नागपूर असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे.काल शनिवारी त्याचा १० वीचा इंग्रजी विषयाचा पेपर होता.अभ्यास न झाल्याने आपण उत्तीर्ण होणार नाही,या भीतीने तांदळाच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येणाऱ्या विषारी द्रव्याची पुडी त्याने प्राशन केली आणि पाणी प्याला.यातच त्याला काही वेळाने अस्वस्थता वाटू लागली.सदरची बाब त्याच्या मित्राच्या लक्षात येताच मित्राने आर्यनच्या घरी कळवली.त्याला ग्रामीण रुग्णालय कुही येथे उपचारार्थ भरती करण्यात आले.माहिती मिळताच आर्यनचे वडील विजय लुटे, माजी सरपंच गजानन धांडे यांनी लगेच कुही येथे धाव घेतली.कुही ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात रवाना केले.नागपूर मेडिकल रुग्णालयात पोहोचताच त्याचा मृत्यू झाला. त्यानुसार कुही पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत पुढील तपास सुरू आहे.
अभ्यासात मागे पडला आणि आत्महत्येचे पाऊल👇
आर्यन हा कुही शहरातील ऋख्खडाश्रम विद्यालयाचा विद्यार्थी होता.गेल्या वर्षी मार्च २०२४ च्या परीक्षेत तो नापास झाला.शासनाच्या नियमानुसार एटीकेटी घेऊन त्याने इतर विद्यार्थ्यांप्रमाणे ११ वीत प्रवेश घेतला होता.परंतु,त्यासाठी दोन परीक्षेत मागे राहिलेल्या विषयात पास होणे गरजेचे होते.त्याअनुषंगाने तो सप्टेंबर महिन्यातील पूरक परीक्षेस बसला होता.परंतु, पेपरच्या दिवशी जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्याचा इतर गावांशी व उमरेड सारख्या शहराशी संपर्क तुटला होता.परिणामी,तो उमरेडला परीक्षेसाठी जाऊ शकला नव्हता.त्यामुळे, अभ्यासात मागे पडला आणि आत्महत्येचे पाऊल उचलले.
- Advertisement -

