Wednesday, August 5, 2026
Homeभंडाराचक्क बिडीओ म्हणाले.! 'गावातील विकास कामात तडजोडही करता येईल,मी त्या पक्षाला बोलावतो'...

चक्क बिडीओ म्हणाले.! ‘गावातील विकास कामात तडजोडही करता येईल,मी त्या पक्षाला बोलावतो’…

- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-गावात विकास कामे तर केली जातात मात्र,विकास कामांच्या नावाखाली भकास कामे करून आपलीच पोळी शेकण्याचा प्रकार सर्वत्र निदर्शनास येऊ लागला आहे.अनेकांना जनतेशी वा गावातील कामे चांगल्या प्रकारे व्हावेत,यांच्याशी कसलेही देणे-घेणे नसते तर केवळ आपले खिसे गरम कसे होणार,याकडे सर्वात जास्त लक्ष असते.त्यातच भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील महालगाव-मोरगाव येथील बांधकामाची चौकशी संदर्भात ग्रामपंचायतीतील तसेच नागरिक उपोषणावर बसल्यानंतर दखल तर घेण्यात आली,मात्र मोहाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांचा दुटप्पीपणाही दिसून आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
‘गावातील विकासाची कामे करता येईल,यासाठी तडजोड करता येईल,मी त्या पक्षाला बोलावतो’ असे मोहाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांनी चक्क तक्रारकर्त्यांना सांगितल्याने खारे पाणी गोडे कसे होऊ लागले अश्या चर्चांना उधाण आले आहे.
महालगाव-मोरगाव येथील दोन सिमेंट रस्त्याचे बांधकाम व एका सिमेंट नालीच्या बांधकाची तक्रार  पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती.उपोषणावर बसल्यानंतरच तक्रारीची दखल घेण्यात आली होती.पाच दिवसांनी चौकशी अहवाल देण्यात येईल,या आश्वासनावर उपोषण सोडण्यात आले होते.
उपोषणाच्या आदल्या दिवशी ज्या व्यक्तींनी बांधकामात अनियमितता केली त्यांच्याशी तडजोड करता येईल,याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी व संबंधित अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता.मात्र त्याच दिवशी अहवाल मागितले गेले.महालगाव-मोरगाव येथील बांधकामाच्या तक्रारीच्या अहवाल तक्रारकर्त्यांना देण्यात आला.त्या अहवालात कोणत्याही प्रकारच्या जावक क्रमांक नाही. तसेच कोणत्या तारखेला अहवाल दिला याबाबत कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही.
दिनेश हरीणखेडे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती मोहाडी👇
त्या प्रकरणात मला स्वारस्य नाही.तडजोड करूया असा मी काही बोललो नाही.त्यांना अहवाल द्यायचा होता,तो मी दिला आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा फटका..! मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यात अनेक ठिकाणी पडलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष सखोल...

वाघाचा हल्ला; एकाचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र काही केल्या थांबेना.मानव वाघांच्या दडित जातो की,वाघ मानवांच्या दडित येतो,हेच कळेनासे झाले आहे.हल्ली मानवाची केवळ किंमत ठरवली जात...

बापरे..!अंतिम संस्काराची तयारी सुरू असतांनाच मृतक व्यक्तीने उघडले डोळे..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्यात एक अचंभित करणारी घटना काल मंगळवारी उघडकीस आली.एका ४० वर्षीय व्यक्तीची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल...

ऑगस्ट महिन्यापासून गॅस कनेक्शनची ई-केवायसी असणे बंधनकारक; अन्यथा कनेक्शन होणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त :-गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि साठेबाजी उघड करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्या इंडेन, एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांसाठी स्वयंपाकाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!