उद्रेक न्युज वृत्त
भंडारा (दिघोरी मोठी) :- दिघोरी येथील ग्रामविकास अधिकारी अनिल धमगाये यांचे स्थानांतर करून नवीन ग्रामविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी; या मागणीचे निवेदन दिघोरीचे उपसरंचासह ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषद सीईओंना दिलेल्या निवेदनात केली आहे.
निवेदनात, दिघोरीचे ग्रामविकास अधिकारी धमगाये हे ग्रामपंचायत सदस्यांसोबत असभ्य वर्तवणूक व अरेरावी करतात.सदस्यांनी तसे कामासंबंधी माहिती मागितल्यास माहितीचा अधिकार लावा अशी भाषा वापरतात.सभेत प्रश्न विचारल्यास मोठ्याने आवाज काढून दाबण्याचा प्रयत्न करतात.कुठल्याही कामाची अपूर्ण माहिती देऊन अंधारात ठेवतात. गावकऱ्यांसोबत गैरवर्तवणूक करतात.यासंबंधी ६ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित सभेत धमगाये यांचे स्थानांतरण इतरत्र करण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला आहे.तसे न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावण्याचा इशारा उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी दिला आहे.सीईओंना निवेदन देतेवेळी,उपसरपंच विजय खोब्रागडे,ग्रापं सदस्य महादेव कांबळे, मोतीराम हुकरे,सत्यपाल पेंदाम,संध्या अवचट,वर्षा अवचट,लोचना आळे,पद्मा देशमुख, जायवन नंदेश्वर,प्रतीमा ढोके,कविता गोटेफोडे उपस्थित होते.
अनिल धमगाये,ग्रामविकास अधिकारी,दिघोरी (मोठी)👇
कार्यालयात कोणत्याही ग्रामपंचायत सदस्यांना मी अरेरावीची भाषा वापरली नाही.सदस्यांनी मागितलेली माहिती त्यांना देत असतो.कुणासोबतही गैरवर्तवणूक केले नाही किंवा अंगावर धावून जात नाही.माझ्यावर लावले गेलेले आरोप खोटे आहेत.