Thursday, May 28, 2026
Homeभंडारागोसेखुर्द धरणाचे संपूर्ण ३३ दरवाजे खुले; वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

गोसेखुर्द धरणाचे संपूर्ण ३३ दरवाजे खुले; वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-तीन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यातच नाही तर सगळीकडेच संततधार पाऊस सुरू असल्याने  नदी,नाले दुथडी भरून वाहू लागलेत.अश्यातच गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस पडल्याने आज,मंगळवार ८ जुलै रोजी गोसेखुर्द धरणाचे संपूर्ण ३३ पैकी ३३ दरवाजे १.५० मीटरने उघडण्यात आले आहेत. सध्या धरणातून ११ हजार ११७.६६ क्युसेक पाण्याच्या विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.सतत तीन दिवस धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे भंडारा शहराजवळील वैनगंगा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे.पूरसदृश स्थितीमुळे आतापर्यंत जिल्ह्यातील १५ रस्ते बंद झाले असून तुमसर ते बालाघाट आंतरराज्यीय मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दरम्यान,कारधा पुल (जुना) येथे वैनगंगा नदीची इशारा पातळी ही २४५ मीटर आणि धोका पातळी २४५.५६ मीटर आहे.आज मंगळवारी सकाळी ८ वाजता वैनगंगा नदीच्या पाणी पातळीने इशारा पातळी गाठली असून तसेच धापेवाडा धरणाचे विसर्ग पाहता धोका पातळी ओलांडण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.भंडारा जिल्ह्यातील सातही मंडळात एकूण ३८ गावात अतिवृष्टी झाली असून तुमसर तालुक्यातील सिहोरात २३१.५० मीमी सर्वाधिक पाऊस पडला आहे.तर नैसर्गिक आपत्तीने जिल्ह्यातील ७२ घरांचे अंशतः तर दोन घरांचे पुर्णतः नुकसान झाले आहे.सद्यःस्थितीत भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून पुराचे पाणी व इतर साथीचे रोग बळावण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी,असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दहा वर्षांपेक्षा जास्तकाळ कार्यरत असलेल्या इतर अनेक अभियंत्यांची यादी उपलब्ध असतांना केवळ मलाच लक्ष्य केले जाते.. – कोरचीतील नाडेकल पुलाशी संबंध नसल्याचा कार्यकारी अभियंता...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामात भ्रष्टाचार,अनियमितता तसेच नाडेकल पुलाच्या बांधकामासंदर्भात माध्यमातून प्रसिद्ध आरोप निराधार असल्याचा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक-२ चे कार्यकारी...

चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गृहप्रवेशाच्या पत्रिका देण्यासाठी निघालेल्या तरुणावर वाटेतच काळाने झडप घालून मृत्यूने गाठल्याची घटना आज,गुरुवार २८ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान धानोरा...

पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा शेतशिवारात आढळला मृतदेह.. – वाघाच्या अफवेने वनविभागासह पोलिस यंत्रणेची मोठी धावपळ..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-घरच्यांना दवाखान्यात जात असल्याचे सांगून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा चक्क शेतशिवारात मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.पण,मृतदेहावरील खुणा पाहून...

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!