उद्रेक न्युज वृत्त
नवी दिल्ली :- प्रेमाच्या आणाभाका टाकण्यासाठी १४ फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेटाइन डे साजरा केला जातो; परंतु भारतीय संस्कृतीचा संदर्भ देत पशु कल्याण मंडळाने व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी गायींना मिठी मारून १४ फेब्रुवारी दिवस साजरा करण्याचे
आवाहन केले होते.त्यानंतर विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांसह नेटकऱ्यांनी ‘काऊ हग डे’ची खिल्ली उडवल्यानंतर निर्णय रद्द करण्यात आला आहे.गाईला मिठी मारण्यासाठी १४ फेब्रुवारीच का? इतर दिवस का नाही? असा प्रश्नही सोशल मीडियावर उपस्थित करण्यात आल्या नंतर सदर निर्णय रद्द करण्यात आला आहे.