- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर शहरात धक्कादायक घटना काल,सोमवार १४ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली आहे.एका सातव्या वर्गात शिकणाऱ्या व चौथ्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन चीमुकल्यांवर दोन नराधमांनी अत्याचार केल्याची घटना चिमूर शहरात उघडकीस येताच नागरिकांनी एकच संताप व्यक्त केला.अशातच घटनेचा निषेध व्यक्त करीत आरोपींवर कठोर कारवाई मागणी करीत रात्रीच्या सुमारास संतप्त जमावाने चिमुर पोलिस ठाण्याला घेराव घालून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी,अशी मागणी केली.रसिद रूस्तम शेख वय ५८ वर्षे व नसिर वजीर शेख वय ४८ वर्षे असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.हे दोघेही चिमूर शहरातील असून दोन अल्पवयीन मुली त्याच वार्डातील आहेत.दोन्ही आरोपी हे खाऊ घेऊन देण्याचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार करीत होते.रसिद रूस्तम शेख हा नड्डे(पिंगर) विक्री करतो तर नसिर वजीर शेख हा बर्फाचा गोला विक्री करतो.अशातच एका चिमुकलीने स्वतःचे आईला काल सोमवारी रात्री अत्याचार झाल्याबाबत माहिती दिली.त्यांनतर कालच रात्री पीडीतेच्या आईने चिमूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली.घटनेची माहिती नागरिकांना होताच संतप्त जमावाने निषेध व्यक्त करीत पोलीस स्टेशन परिसरात संताप व्यक्त करून दगडफेक केली.संतप्त झालेल्या जमावामुळे आरोपींना आमच्या ताब्यात द्या,अशी मागणी केली.चिमूर पोलिसांनी दोन्ही आरोपींना रात्री उशिरापर्यंत अटक केली.दरम्यान आज,मंगळवारी १५ एप्रिलला दोन्ही आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात आले.न्यायालयाने दोघांनाही एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.परत उद्या बुधवार १६ एप्रिल रोजी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीप्ती मरकाम करीत आहेत.
- Advertisement -