Friday, September 4, 2026
Homeगडचिरोली'जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा २०२५' उपक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न...

‘जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा २०२५’ उपक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-भावी पिढ्यांसाठी पाणी सुरक्षित ठेवण्यासाठी सामुहिक जबाबदारीतून पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन,जनजागृती आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगसारख्या उपाययोजनांची अंमलबजावणी  प्राधाण्याने करण्याची गरज मत्स्यव्यवसाय विभागाचे  सहाय्यक आयुक्त समीर डोंगरे यांनी व्यक्त केली.
जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित “जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा २०२५” उपक्रमाचा उद्घाटन सोहळा आज,मंगळवार १५ एप्रिल रोजी गडचिरोली पाटबंधारे विभागात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन समीर डोंगरे यांच्या हस्ते संपन्न झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कृषी अधिक्षक प्रीती हिरळकर तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ.सविता सादमवार,जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव,सामाजिक कार्यकर्ते मनोहर हेपट व राहुल गुळघाने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना प्रीती हिरळकर यांनी जलसंवर्धनासाठी प्रत्येक व्यक्तीचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले.तर डॉ.सादमवार यांनी जलजागृतीसाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत मांडले.पाणी हा फक्त निसर्गसंपत्तीचा भाग नसून तो संस्कृतीचा आणि समाजाच्या आरोग्याचा आधार असल्याच्या त्या म्हणाल्या.कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे यांनी जलसंकट टाळण्यासाठी युवकांचा सक्रीय सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले.त्यांनी जलप्रदूषण टाळणे,पाण्याचा पुनर्वापर करणे,घराघरात रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसवण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अभियंता गणेश परदेशी यांनी केले.जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा १५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान जिल्हा, तालुका व गाव पातळीवर विविध उपक्रमांद्वारे राबविण्यात येणार असल्याचे माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दीपक भांडेकर तर आभार प्रदर्शन कमलेश आखाडे यांनी केले.कार्यक्रमास सहाय्यक अभियंता अमित डोंगरे,पाटबंधारे विभागाचे अधिकारी,कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!