उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- थोर क्रांतिकारक विर बाबुराव सेडमाके यांनी जुलमी इंग्रज राज्य व्यवस्थेविरुद्ध लढा उभारुन चंन्द्रपुर,गडचिरोली सारख्या अतिदुर्गम भागाचा इतिहास रचला;त्यांच्या विचारांची प्रेरणा घेवुन आदिवासी समाज बांधवासह बहुजन समाज बांधवांनी प्रस्थापित सत्तेच्या विरोधात यल्गार पुकारावा; असे प्रतिपादन आदिवासी समाजाचे नेते रामदास मसराम यांनी केले.
देसाईगंज येथिल शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात आज दिनांक -२१ ऑक्टोंबर २०२३ रोजी क्रांतिविर बाबुराव सेडमाके यांच्या स्मृती दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी एकनाथ पिलारे,दिलिप नाकाडे,बंडुभाऊ सिडाम,भाष्कर कन्नाके,भुनेश्वर ढोमणे,प्रदिप मुंगणकर,योगेश ढोरे, कोडापे गुरुजी,प्रफुलदास शेन्डे,प्रेमदास मेश्राम, जि.एन.लाडे,राजुभाऊ मेश्राम,राजुभाऊ बुल्ले,ज्ञानदेव पिलारे,पंकज ढोरे,नंदरधने गुरुजी,झुरे गुरुजी,वैरागडे यांचेसह अण्य मान्यवर उपस्थित होते.प्रसंगी विचार व्यक्त करतांना रामदास मसराम म्हणाले की, क्रांतिविर बाबुराव सेडमाके यांनी १८ व्या शतकात चंन्द्रपुर,गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल अतिदुर्गम भागात इंग्रज शासन व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारले होते,या भु-भागावरिल जमिन,जंगल आणि जलाचे रक्षण संवर्धन आणि संगोपण आदिवासी आणि बहुजन समाज करतो.मग अतिरिक्त कर आम्ही शासनाला का म्हनुण भरायचा? त्याचबरोबर इंग्रजांनी केलेले कायदे हे गुलामगिरी लादनारे असल्यानेअल्पवयिन असलेल्या बाबुराव सेडमाके यांनी जुलुमी इंग्रज सरकार विरोधात बंड पुकारले.फोडा आणि राज्य करा; हे धोरण अवलंबुन त्यांच्याच परिवारातिल बहिणीने इंग्रजांच्या आमिषाला बळी पडुन बाबुराव सेडमाके यांना मोठ्या शिताफिने पकडुन दिले.वयाच्या २५ व्या वर्षी इंग्रजांनी अतिशय क्रृरपणे फाशिची शिक्षा दिलीबाबुराव सेडमाके यांच्या विचारांची प्रेरणा घेवुन आदिवासी समाजबांधवांसह बहुजन बांधवांनी दडपशाही अवलंबलेल्या प्रस्तापित शासन विरोधात बंड पुकारले पाहिजे;असे प्रतिपादन रामदास मसराम यांनी विर बाबुराव सेडमाके स्मृती अभिवादन दिनी केले.