Thursday, October 15, 2026
Homeगडचिरोलीयेत्या सोमवारपासून अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया.. - शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चे वेळापत्रक...

येत्या सोमवारपासून अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया.. – शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चे वेळापत्रक जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-१ आणि भाग-२ भरण्याची सुविधा येत्या,सोमवार ११ मे २०२६ पासून अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.यापूर्वी प्रवेश अर्जाचा भाग-१ भरण्याची सुविधा १० एप्रिल २०२६ पासून उपलब्ध करून देण्यात आली होती.अश्यातच आज,शुक्रवार ८ मे २०२६ पर्यंत राज्यभरातील ७ लाख ७४ हजार ९१८ विद्यार्थ्यांनी भाग-१ भरून नोंदणी पूर्ण केली आहे.
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा सुरू होत असून विद्यार्थ्यांनी https://mahafyjcadmissions.in या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध सूचना काळजीपूर्वक वाचून आपला प्रवेश अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावा, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे.
या प्रवेश प्रक्रियेत तीन नियमित फेऱ्या, ‘ओपन टू ऑल’ चौथी फेरी तसेच मुलींसाठी विशेष पाचवी फेरी घेण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांनी आपल्या पसंतीक्रम,गुण व लागू आरक्षणानुसार कनिष्ठ महाविद्यालयांची निवड करावयाची आहे.एका विद्यार्थ्याला किमान १ व कमाल १० कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविता येणार आहेत.
  • शून्य फेरीचे वेळापत्रक👇
विद्यार्थ्यांची नोंदणी व अर्जाचा भाग-१ ऑनलाइन सादर करणे ८ ते १० मे दरम्यान होणार आहे. तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी ११ ते १३ मे दरम्यान प्रसिद्ध करण्यात येईल.या यादीबाबत हरकती किंवा दुरुस्ती असल्यास विद्यार्थ्यांना १४ ते १५ मे दरम्यान लॉगिनमधील ‘Grievance Redressal’ सुविधेद्वारे मागणी सादर करता येईल.त्यानंतर संबंधित उपसंचालक शिक्षण यांच्या स्तरावर हरकतींचे निराकरण करून २० मे रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी अंतिम करण्यात येणार आहे.
  • नियमित कॅप फेरी-१👇
नियमित कॅप फेरी-१ अंतर्गत नवीन विद्यार्थी नोंदणी, भाग-१ मधील बदल आणि भाग-२ मध्ये पसंतीक्रम नोंदविण्याची प्रक्रिया २१ मे सकाळी ८ वाजेपासून २२ मे सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहील.अलॉटमेंट प्रक्रिया २३ ते २६ मे दरम्यान पूर्ण केली जाणार असून २६ मे रोजी कनिष्ठ महाविद्यालय वाटप यादी, कटऑफ यादी आणि विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये वाटपाचा तपशील प्रदर्शित केला जाणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांना वाटप झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा आहे,त्यांनी ‘Proceed for Admission’ करून कागदपत्र पडताळणीसाठी संबंधित महाविद्यालयात उपस्थित राहून प्रवेश निश्चित करावा.प्रवेश निश्चितीची प्रक्रिया २६ ते २८ मे २०२६ दरम्यान होणार आहे.रिक्त जागा २९ मे रोजी प्रदर्शित करण्यात येतील,तर दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक ३० मे २०२६ रोजी जाहीर केले जाणार आहे.
विद्यार्थी,पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी प्रवेश प्रक्रियेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या सूचना वेळोवेळी पाहाव्यात.अधिक माहितीसाठी अधिकृत पोर्टल https://mahafyjcadmissions.in, ई-मेल support@mahafyjcadmissions.in तसेच हेल्पलाईन क्रमांक ८५३०९५५५६४ उपलब्ध आहे, असे शिक्षण संचालनालय,महाराष्ट्र राज्य,पुणे यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा; दिवाळीपूर्वी मिळणार पाच हजार रूपयांची मदत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र राज्य सरकारने दुष्काळग्रस्त यादीत ४० नवीन तालुक्यांचा समावेश केल्यामुळे ३५८ पैकी एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.अश्यातच खरीप...

आता राज्यातील ३०५ तालुके अंतिमतः दुष्काळी तालुके म्हणून घोषित.. – आणखी ४० तालुक्यांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील खरीप हंगामातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.यापूर्वी ट्रिगर-१(प्रथम कळ)अंतर्गत २६५ तालुके दुष्काळी तालुके म्हणून...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी सण-उत्सव,नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तसेच संभाव्य आंदोलने व सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा...

आमदार रामदास मसरामांनी आश्रमशाळा व मृतक विद्यार्थीनीच्या कूटूंबियांची घेतली भेट.. -पोलीस निरीक्षकांना आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची सूचना..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या शासकीय आश्रमशाळा सोनसरी येथील आठव्या वर्गाची विद्यार्थीनी राणू क्रिष्णा हलामी रा.मोहगांव हिने वसतिगृहातच गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!