Thursday, April 30, 2026
Homeआरमोरीकौटुंबिक कारणावरून झालेल्या वादात पतीने केली पत्नीला बेदम मारहाण; मारहाणीत पत्नीचा मृत्यू......

कौटुंबिक कारणावरून झालेल्या वादात पतीने केली पत्नीला बेदम मारहाण; मारहाणीत पत्नीचा मृत्यू… – आरमोरी तालुक्याच्या वैरागड येथील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-कौटुंबिक कारणावरून झालेल्या वादात पतीने पत्नीला बेदम मारहाण केल्याने पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना आरमोरी तालुक्याच्या वैरागड येथील कहार मोहल्ल्यात काल, शनिवार दिनांक-२ नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास घडल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.किरण राजू पंडेलगोत अंदाजे वय ३५ वर्षे,रा.वैरागड,ता.आरमोरी, जि.गडचिरोली असे मृत पत्नीचे नाव आहे.
पती राजू उर्फ पन्ना परसराम पंडेलगोत वय ४० वर्षे  याचे पत्नी किरणसोबत घटनेच्या दिवशी कडाक्याचे भांडण झाले.भांडण सुरू असतांना राजू चा राग अनावर झाला.त्यातच त्याने पत्नीला बेशुध्द पडेपर्यंत बेदम मारहाण केली.पत्नी बेशुध्द पडताच कुटुंबीयांनी तिला वैरागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले.उपचारार्थ दाखल केले असता
वैद्यकीय अधिकारी विजय धुमाळे यांनी तपासणी अंती किरणला मृत घोषित केले.त्यानंतर वैद्यकीय अधिकारी तसेच गावातील पोलिस पाटील गोरखनाथ भानारकर यांनी सदर घटनेबाबत आरमोरी पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करीत आरोपी पती राजू यास अटक करण्यात आली आहे.घटनेचा पुढील तपास आरमोरी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कैलास गवते यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक प्रदीप लांबतुरे करीत आहेत.
माहितीनुसार,आरोपी राजू हा हमालकीचे काम करायचा पत्नीही रोजंदारी,शेतमजुरी व इतर कामे करून कुटुंबासाठी हातभार लावायची.किरण पश्चात नऊ वर्षाचा मुलगा व पाच वर्षाची मुलगी असून आईच्या हत्येने दोन्ही मुले पोरकी झाली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!