उद्रेक न्युज वृत्त
कोरपना ता.प्र./नितेश केराम
कोरपना(चंद्रपूर) :- कोरपना तालुक्यास आज दुपारच्या सुमारास प्रचंड वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसू लागल्या होत्या.अशातच जोरदार सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे वडगाव येथे कामाला गेलेल्या ३५ वर्षीय महिलेचा अंगावर झाड कोसळून मृत्यू झाल्याची घटना आज १० जून २०२३ रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे.
सविस्तर वृत्त असे की,वडगाव येथील गुलाल जिवतोडे यांच्या शेतात वैशाली गोवर्धन उरकुडे वय ३५ वर्षे ही महिला सरकी म्हणजेच बी-बियाणे वेचायला गेली होती.मात्र अचानक येणारे पाऊस व वादळी वाऱ्यामुळे सदर महिला शेतातील जवळच असलेल्या झाडाच्या आडोशाला उभी राहिली असता; भला मोठा झाड सदर महिलेच्या अंगावर कोसळल्याने वैशाली उरकुडे या महिलेची प्राणज्योत मावळली असल्याने कोरपना तालुक्यातील परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.