Wednesday, October 21, 2026
Homeब्रम्हपुरीब्रम्हपुरी विधानसभेत अबकी बार किसान सरकारचे गुंजनार नारे...! 

ब्रम्हपुरी विधानसभेत अबकी बार किसान सरकारचे गुंजनार नारे…! 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

ब्रम्हपुरी :- शेतकरी बांधवांच्या सर्वांगीण विकासाचे खरे चित्र देशातील तेलंगाना राज्यात दिसुन येत आहेत.२४ तास चांगल्या दाबाची मोफत वीज आणि पाणी,प्रत्येक सिजनमध्ये पेरणीसाठी १० हजार रुपये मदत,शेळी पालनसाठी ७५% सब्सिडी,५ लाख रुपये किसान विमा,ट्रॅक्टर खरेदीसाठी ९५% सब्सिडी अशा विविध शेतकरी योजनांच्या आधारे तेलंगणातील शेतकरी बांधव सुखमय जीवन जगतांना दिसून येत आहेत.अशातच ब्रम्हपुरी विधानसभेतील शेतकरी बांधवांचा फायदा घेत आज पर्यंत फक्त राजकारण करण्यात आले आहे.ब्रम्हपुरी विधानसभेतील अनेक शेतकरी बांधव चिंताग्रस्त व अडचणींचा सामना करतांना दिसून येत आहेत.त्यामुळेच किसान क्रांतीचे वादळ निर्माण करण्यासाठी भारत राष्ट्र समितीचे संयोजक निहाल ढोरे,देवनंदन ठेंगरी,मायासिंग बावरी  यांच्या नेतृत्वात ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात गुलाबी वादळ सुरु होत आहे.

शेतकऱ्यांचा पक्ष म्हणुन भारत राष्ट्र समितीला कमी वेळेत ब्रम्हपुरी विधानसभेत जनतेचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.भारत राष्ट्र समितीचे ब्रम्हपुरी विधानसभेत १० हजार सभासद नोंदणी करण्याचे ठरविले आहे.तसेच २०२४ मध्ये लोकसभा, विधानसभा,जिल्हा परिषद,पंचायत समिती निडणुकीसाठी सज्ज असल्याचे चित्र समोर येत आहे. भारत राष्ट्र समितीच्या प्रचारावर जोर वाढविला आहे. 

भारत राष्ट्र समितीचे प्रचार यात्रेत संयोजक सत्यपाल गोठे,अजय शेंडे,प्रविन कुथे,सतिश बनकर,गणेश बागमारे अमीन शेख,सागर सहारे,दिपक नन्नावरे, रुपेश ठाकरे,समिरसिंग भुरानी,शुभम गेडाम,क्रिष्णा खरवडे,सतिश दर्वे,अरमान पठाण इत्यादी कार्यकर्ते सहभागी होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज २०२६’ अंतर्गत जनजागृती सत्राचे आयोजन.. – विद्यार्थी व नवउद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण विचार, सर्जनशीलता,समस्या निवारणाची क्षमता आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज...

आंघोळीसाठी तलावात उडी; दोघेजण बचावले..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या अंबाझरी तलावात आंघोळीसाठी उडी मारलेले दोन युवक बुडता-बुडता बचावले.विशेष म्हणजे,धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची एक टीम नागरिकांच्या सुरक्षेसाठी...

शेतात धान कापण्यासाठी गेली ती परतलीच नाही; वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातून ऐन सणाच्या दिवशीच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.शेतावर धान कापणीसाठी गेलेल्या वृध्द महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार...

गडचिरोली सायबर कमांडो पथकाची उल्लेखनीय कामगिरी.. -हरवलेले तब्बल ६ लाख रुपये किंमतीचे २१ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विजयादशमी हा सण सत्याचा असत्यावर आणि चांगुलपणाचा वाईट प्रवृत्तींवर विजय मिळविण्याचा संदेश देतो.याच शुभमुहूर्तावर आज गडचिरोली पोलीस स्टेशनने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!