उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज (गडचिरोली):- जिल्हा परिषद हायस्कूल कुरुड शाळेचे मुख्याध्यापक वकील शेख यांना यंदाचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे.जय हिंद सेवाभावी सामाजिक संस्था परभणी व्दारा दर वर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व कर्तृत्व गाजविणाऱ्या व्यक्तींचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतो.यावर्षी महाराष्ट्रातील २२ व्यक्तींना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.त्यामध्ये वकील शेख यांना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
वकील शेख यांना या पूर्वी महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार,मानव संसाधन मंत्रालय भारत सरकारचा युवा पुरस्कार सह अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून महाराष्ट्रातील अनेक सामाजिक, साहित्यिक,शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा संबंध असुन,मुंबई दूरदर्शन,आकाशवाणी नागपूर वरून त्यांच्या कविता प्रसारित झालेल्या आहेत. त्यांनी विविध विद्यार्थ्यांना घडवून आणले आहे.तशाच प्रकारे ‘इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एअर फॉर ब्लू स्काय ॲण्ड वर्ल्ड ओझोन डे’ निमित्त महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ मुंबईव्दारा आयोजित पोस्टर व रांगोळी स्पर्धेत जिल्हा परिषद हायस्कुल कुरूडच्या विद्यार्थिनींनी यश प्राप्त केला आहे.संपूर्ण राज्यातुन वैष्णवी भजने हिने पोस्टरमध्ये तिसरा क्रमांक,तर कृतिका धोंगडे हिने रांगोळीमध्ये तिसरा क्रमांक पटकाविला आहे.तसेच तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत खुशी शिंगाडे हिने १५०० मीटर धावणे,गोळाफेकमध्ये प्रथम क्रमांक आणि थाळीफेकमध्ये व्दितीय क्रमांक प्राप्त केले आहे. अभय ढोरे याने २०० मीटर धावण्यामध्ये व्दितीय स्थान पटकाविले आहे.सुयश प्राप्त विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक वकील शेख,शिक्षक डी.व्ही.रामटेके,बी. टी.सेलुकर, डब्ल्यु.के.भानारकर,एन.बी.मेश्राम,ए.ए. उईके,पी.वाय.नाकाडे,एच.आर.झाडे,डी.डी. ब्रह्मनायक,आर.व्ही.नारनवरे,निशा भाकरे,रोहिणी सहारे,यांच्यासह शाळा समितीच्या पदाधिका-यांनी कौतुक केले आहे.