उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- कुरुड येथे होळी चौकातील नागठाना परिसरात काही घराच्या जवळपासच दाने यांचा वाडा असून त्यांच्या जणावरांसाठी जवळपास १५ ट्रिप तनीस ठेवण्यात आली होती. आज २९ मार्च च्या दुपारी २ वाजताच्या सुमारास अज्ञात कारनामुळे सदर तणशीच्या ढगातून धूर दिसू लागल्या बरोबर गावातील काही नागरिकांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य अविनाश गेडाम यांना वरील आगीबाबत कळविले, त्यांनी क्षणाचाही विलंब न करता देसाईगंज येथील नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाला फोन लावून सदर आग विझविण्याबाबत विनंती केली.देसाईगंज नगरपरिषदेचे कर्मचारी अग्निशमक वाहन घेऊन घटनास्थळी पोहचले.तो पर्यंत आगीने उग्र रुप धारण केले होते.चारही बाजुंनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.तेव्हा जवळपासच्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.उन्हाळ्याचे दिवस,दुपारची वेळ व हवा चालु असल्यामुळे आग आजूबाजूला पसरण्याची दाट शक्यता नाकारता येत नव्हती; त्या परिस्थितीत आग आटोक्यात आणल्याबद्दल अग्निशमक दलाचे अभिनंदन करण्यात येत आहे.प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य अविनाश गेडाम,ग्रामविकास अधिकारी संजय चलाख,गुड्डू राऊत,तसेच नगरपरिषदचे वाहन चालक भारत खरकाटे,फायरमन राजु निंबेकर,प्रेमचंद चव्हाळे,सुनील नाकाडे उपस्थित होते.