Wednesday, May 13, 2026
Homeचंद्रपूरकागदपत्रे मागितले असता बिंग फुटले अन् जाळ्यात अडकले..! - गोंदिया,भंडारा येथुन जनावरे...

कागदपत्रे मागितले असता बिंग फुटले अन् जाळ्यात अडकले..! – गोंदिया,भंडारा येथुन जनावरे खरेदी केल्याच्या सादर केल्या पावत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक होत असल्याची गुपितरित्या माहिती चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळताच वाहने अडवून माहिती घेण्यात आली असता ट्रक चालक व क्लिनर यांनी गोंदिया,भंडारा येथुन जनावरे खरेदी केल्याच्या पावत्या सादर केल्या.मात्र,तपासणीअंती वाहतूक करण्यात येत असलेल्या पावत्यांवर शासकीय अधिकाऱ्यांच्या करण्यात आलेल्या स्वाक्षऱ्या बनावट असल्याचे आढळून येताच बिंग फुटले अन् जाळ्यात अडकले असल्याची घटना शनिवार २१ जून रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या घूग्घूस मार्गावरील धानोरा टोल नाका परिसरात घडली.प्रकरणी तब्बल ६ ट्रक आणि ७२ गोवंश असा एकूण १ कोटी ७० लाख ७० हजार  रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून १८ आरोपींविरुद्ध घुग्गुस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहितीनुसार,अवैधरीत्या गोवंशाची घुग्घुस मार्गाहून पडोली,चंद्रपुर असे तेलंगणा राज्यात वाहतुक होत असल्याची माहिती चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला प्राप्त झाली.प्राप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने धानोरा टोल नाका,घुग्घुस मार्गे या ठिकाणी नाकाबंदी करून ६ ट्रकची पाहणी केली असता, वेगवेगळया ट्रक मध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात गाई,बैल (गोवंश) भरून त्यांची कत्तली करीता वाहतुक करतांना आढळून आले.सदर वाहनाचे चालक,क्लिनर यांना वाहतुक करीत असलेल्या जनावरांबाबत कागदपत्रे मागितले असता त्यांनी गोदिया,भंडारा येथुन जनावरे खरेदी केल्याच्या पावत्या सादर केल्या.सदर पावत्या संबंधाने पडताळणी केली असता जनावरे वाहतुक करीत असलेल्या पावत्यांवर शासकीय अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करुन अवैधरीत्या गोवंशाची वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले.त्यानुसार ट्रक चालकांकडुन ६ ट्रक,जनावरे वाहतुक करण्यासाठी वापरलेली पायलटींग वाहने व ७२ गोवंश असा एकुण १ कोटी ७० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एकुण १८ आरोपींविरुध्द घुग्घुस पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला.अवैधरित्या कत्तली करीता वाहतुक करीत असलेले जनावरे हे सुरक्षेच्या दृष्टीने प्यार फाउंडेशन, छोटा नागपुर,जि.चंद्रपुर यांचेकडे जमा करण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकार,पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले,पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकार,पोलीस उपनिरीक्षक
 सुनिल गौरकार,सहाय्यक फौजदार. धनराज करकाडे, पोलीस हवालदार सुभाष गोहोकार,सतिश अवथरे, रजनिकांत पुठ्‌ठावार,जयसिंग,गणेश मोहुर्ले,संतोष येलपुलवार,नितीन रायपुरे,प्रशांत नागोसे,किशोर वाकाटे, शशांक बदामवार,दिनेश अराडे,रूषभ बारसिंगे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर तसेच पोलीस स्टेशन, घुग्घुस येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक तायवाडे यांचेसह अधिकारी, कर्मचारी तसेच पशुधन विकास अधिकारी घुग्घुस यांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दहशतवादविरोधी पथकाचे नागपूर,भंडारा,चंद्रपूरसह रज्याभरात छापे..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दहशतवादविरोधी पथकाने आज,बुधवार १३ मे रोजी सकाळपासूनच राज्यभरात धडक कारवाईचा सपाटा चालवला.पाकिस्तानस्थित गँगस्टर शहजाद भट्टी याच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींच्या शोधासाठी मुंबईसह...

गडचिरोली जिल्ह्यातील सात तालुक्यात होणार ४८ हजार लिटर केरोसीनचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-संभाव्य युद्धजन्य परिस्थितीचा विचार करून उद्भवणाऱ्या संभाव्य जोखमीचे निराकरण करण्यासाठी स्वयंप्रकाशासाठी व दिवाबत्तीसाठी सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत केरोसीनचे तालुकानिहाय वाटप करण्याचा निर्णय...

नऊ आरोग्य कर्मचाऱ्यांना ‘फ्लोरेंस नाईटिंगेल’ पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत वीर शहीद बाबुराव शेडमाके सभागृहात  'फ्लोरेंस नाईटिंगेल जिल्हास्तरीय पुरस्कार' वितरण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.या सोहळ्यात...

चक्क वाळू डेपोच्या सावंगी रेतीघाटात अवैध वाळू उपश्याचा खेळ..! – देसाईगंज महसूल अन् पोलीस विभाग निद्रावस्थेत; आम्ही सांगणार तेव्हाच डोळे उघडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात हल्ली रेती उपशाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.पुढील महिन्यापासून लिलाव झालेल्या सर्व रेती घाटांचा ताबा तहसील कार्यालयाकडे सोपविण्यात येणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!