Thursday, July 23, 2026
Homeचंद्रपूर'कांटा लगा गाणे' म्हणत तरुणाला बेदम मारहाण करणाऱ्या ठाणेदाराची तडकाफडकी बदली…

‘कांटा लगा गाणे’ म्हणत तरुणाला बेदम मारहाण करणाऱ्या ठाणेदाराची तडकाफडकी बदली…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- मागील गुन्ह्याचा तपास करायचा असल्याचे सांगून तांडा (धानोली) येथील २८ वर्षीय युवकाला बेदम मारहाण केल्याने पोलिस अधीक्षकांनी कोरपनाचे ठाणेदार संदीप एकाडे यांची सोमवारी तडकाफडकी जिल्हा नियंत्रणात कक्षात बदली केली.त्यांच्या जागेवर नवीन ठाणेदार म्हणून अजिंक्य तामडे यांची नियुक्ती झाली असून ते मंगळवारी ठाण्यात रुजू झाले.तांडा (धानोली) येथील रमेश मुनावत यांच्या घरी अवैध दारूसाठा असल्याच्या संशयावरून शुक्रवारी दि.७ जून च्या रात्री ७ वाजता कोरपनाचे ठाणेदार संदीप एकाडे व पोलिसांचे पथक गेले होते.दरम्यान, रमेश मुनावत यांचे पुतणे व तक्रारदार विपुल मुनावत हे घटनास्थळी आले.लहान मुलीशिवाय घरी कोणीच नाही,अशी माहिती पोलिसांना दिली.मात्र, ठाणेदारांनी शासकीय कामात अडथळा आणू नकोस,असे बजावले आणि काका रमेश मुनावत यांच्या घराची तपासणी केली.त्यानंतर तुझे घर कुठे आहे; अशी विचारून विपुल मुनावत यांच्याही घराची झडती घेतली; पण झडतीत काहीच आढळले नाही.त्यानंतर मागील गुन्ह्याचा तपास करायचा आहे; अशी सूचना देऊन विपुलला शनिवारी दि.८ जून ला ठाण्यात बोलावले.एका शिपायाला पट्टा घेऊन येण्यास सांगितले आणि विपुलच्या हाता-पायासह पाठीवर पट्ट्याने मारहाण केली.विशेष म्हणजे मारहाण करताना पोलिस निरीक्षक संदीप एकाडे हे ‘कांटा लगा गाणे म्हणत’ मारहाण करीत होते; अशी ऑडिओ क्लिप पुढे आली आहे.विपुल ठाणेदार याला विनवणी करीत होता.मात्र त्याचे काही न ऐकता अमानुष मारहाण सुरू होती.मात्र गावकऱ्यांना हा प्रकार कळताच त्यांनी १० जून रोजी दुपारी १२ वाजता पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची भेट घेतठाणेदार एकाडे यांच्यावर कारवाई करावी; अशी मागणी केली होती.पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केल्याने सोमवारी ठाणेदार एकाडे यांची तडकाफडकी बदली झाली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात; पहिली यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना-२०२६' अंतर्गत आज,बुधवार २२ जुलै रोजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती दिनाचे तसेच मुख्यमंत्री...

अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण; तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,बुधवार २२ जुलै रोजी अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वृक्षारोपण...

उद्याला महाराष्ट्र बंदची हाक..!

उद्रेक न्युज वृत्त :-देशाची राजधानी दिल्ली येथे सुरू असलेल्या नीट पेपरफुटी आंदोलन प्रकरणाला आता राजकीय वळण येऊ लागले आहे.विशेष म्हणजे, दिल्लीतील जंतर-मंतर आणि संसद...

देसाईगंजच्या शंकरपुर परिसरात सर्वात जास्त पावसाची नोंद; तर २० महसुल मंडळात मुसळधार पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात काल मंगळवारपासून ते आज बुधवार सकाळपर्यंत दमदार पावसाने हजेरी लावली.अजूनही पाऊस सुरूच आहे.२४ तासात जिल्ह्यात सरासरी ५१.४ मिमी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!