Thursday, July 23, 2026
Homeगडचिरोलीकुटुंबासह सहलीला गेलेल्या दोन जणांचा धबधब्यात बुडून मृत्यू…-आरमोरी येथील एक जण तर...

कुटुंबासह सहलीला गेलेल्या दोन जणांचा धबधब्यात बुडून मृत्यू…-आरमोरी येथील एक जण तर दुसरा चंद्रपूर येथील..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- भामरागड तालुक्यातील निसर्गरम्य बिनागुंडा येथे कुटुंबासह सहलीला गेलेल्या दोन जणांचा धबधब्यात बुडून मृत्यू झाला.ही घटना आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली.बादल श्यामराव हेमके वय ३९ वर्षे, रा.आरमोरी आणि नवनीत राजेंद्र धात्रक वय २७ वर्षे,रा.चंद्रपूर अशी मृतांची नावे आहेत.

नवनीत धात्रक हा बादल हेमके यांच्या जवळचा नातेवाईक आहे.हेमके हे भामरागड तालुक्यातील पल्ली ग्रामपंचायतीचे ग्रामसवेक होते.ते भामरागड येथे वास्तव्याने होते.७ जूनला नवनीतचे लग्न झाले. त्यानंतर तो पत्नीसह हेमके यांच्या घरी गेला.आज दोघांचेही कुटुंबीय बिनागुंडा येथील धबधबा पाहण्यासाठी गेले.त्यावेळी नवनीत आंघोळीसाठी पाण्यात उतरला.मात्र तो खोल पाण्यात बुडाला. त्याला वाचविण्यासाठी हेमके हे मदतीला धावले.मात्र, दोघांनाही पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.दोघांच्याही कुटुंबीयांच्या समक्ष ही हृदयद्रावक घटना घडली.घटनेची माहिती मिळाल्यानंतर लाहेरी येथील पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.दोघांचेही मृतदेह भामरागड येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आले.लग्नाला चार दिवस होत नाही; तोच पतीचे निधन झाल्यामुळे पत्नीवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात; पहिली यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना-२०२६' अंतर्गत आज,बुधवार २२ जुलै रोजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती दिनाचे तसेच मुख्यमंत्री...

अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण; तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,बुधवार २२ जुलै रोजी अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वृक्षारोपण...

उद्याला महाराष्ट्र बंदची हाक..!

उद्रेक न्युज वृत्त :-देशाची राजधानी दिल्ली येथे सुरू असलेल्या नीट पेपरफुटी आंदोलन प्रकरणाला आता राजकीय वळण येऊ लागले आहे.विशेष म्हणजे, दिल्लीतील जंतर-मंतर आणि संसद...

देसाईगंजच्या शंकरपुर परिसरात सर्वात जास्त पावसाची नोंद; तर २० महसुल मंडळात मुसळधार पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात काल मंगळवारपासून ते आज बुधवार सकाळपर्यंत दमदार पावसाने हजेरी लावली.अजूनही पाऊस सुरूच आहे.२४ तासात जिल्ह्यात सरासरी ५१.४ मिमी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!