उद्रेक न्युज वृत्त
नितेश केराम/ कोरपना ता.प्र.
चंद्रपूर :- कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव येथील उपसरपंच विनोद नवले यांनी काँग्रेस पक्षातील विविध पदाधिकारी,मान्यवर व पक्षाची वाढती ताकद लक्षात घेता कांग्रेस पक्षामध्ये पक्ष प्रवेश केला आहे.मागील काही दिवसांपासून विनोद नवले यांची पक्ष प्रवेशाची जयत तयारी सुरू होती.परंतु काही कारणास्तव त्यांचा पक्ष प्रवेशास उशीर झाला.ना.सुभाष धोटे यांनी कांग्रेस कमेटीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन विनोद नवले यांचा कांग्रेस पक्षामध्ये प्रवेश निश्चित केला आहे.
पक्ष प्रवेश करतेवेळी कांग्रेस पक्षाचे ना.सुभाष धोटे, कोरपना मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे,कोरपना कांग्रेस कमेंटीचे तथा माजी जिल्हा परिषद सदस्य व कोरपना तालुका अध्यक्ष उत्तमराव पेचे, कन्हाळगाव ग्रा.पं.सदस्य महादेव कोवे,सुरेश मोहुर्ले, व कांग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.ना.सुभाष धोटे यांनी विनोद नवले यांना गाव विकास व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व त्याचे अभिनंदन केले.