Monday, September 21, 2026
Homeगडचिरोलीकोरोणा काळात तात्पुरत्या स्वरूपात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना त्वरित नियुक्ती द्या.....अन्यथा आंदोलन -...

कोरोणा काळात तात्पुरत्या स्वरूपात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना त्वरित नियुक्ती द्या…..अन्यथा आंदोलन – शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- संपूर्ण देशात कोरोना संसर्गजन्य आजाराने हाहाकार माजवला होता.कोरोणामुळे अनेकांनी जीव गमावले होते.अशातच कोरोना काळात नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता कामे करून शासनाची मदत केली.काही वर्षानंतर कोरोना  संसर्गजन्य आजारावर नियंत्रण करण्यात शासनास यश आले.परंतु नंतरच्या काळात तात्पुरत्या स्वरूपात काम करणारे कंत्राटी कर्मचारी कामे नसल्याने बेरोजगार झाले.नंतरच्या काळात शिंदे फडवणीस सरकारने कोरोना काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरळ नियुक्ती करू; अशी घोषणा केली.

परंतु आज पर्यंत कोणत्याही कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले नाही.याबाबत गडचिरोली जिल्हा शल्यचिकित्सक रुडे यांना शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विचारणा केली असता; आम्हाला कोणताही आदेश आले नसल्याचे सांगितले.यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुर्णपणे फोल व खोटी घोषणा केल्याचे सिद्ध झाले असल्याचे शिवसेना शिष्ट मंडळास लक्षात आले. कोरोना काळात जीवाची पर्वा न करता तात्पुरत्या स्वरूपात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना त्वरित नियुक्त करावे; अन्यथा शिवसेनेच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला घेराव आंदोलन करण्यात येईल; असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल यांनी दिला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र शासनाच्या वतीने गडचिरोलीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी...

भरधाव ट्रकची कारला मागून जोरदार धडक; दोघांचा करुण अंत,तर पाच जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गावाकडे परत निघालेल्या कुटुंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार...

क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद; बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-अगदी क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद झाला खरी,पण रागाच्या भरात ३० वर्षीय मुलाने  वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याने मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या...

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुंबईतील कोस्टल मार्गावर आज,रविवार २०  सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला.मरीन ड्राईव्हकडून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!