Friday, July 17, 2026
Homeगडचिरोलीधानोरा व एटापल्ली तालुक्यात २० हजार धुररहित चुलींचे वितरण.. -दरवर्षी ४१ हजार...

धानोरा व एटापल्ली तालुक्यात २० हजार धुररहित चुलींचे वितरण.. -दरवर्षी ४१ हजार टनांहून अधिक जळाऊ लाकडाची होणार बचत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शन व पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा व एटापल्ली या दुर्गम,आदिवासी तालुक्यांमध्ये राबविण्यात आलेल्या धुररहित चुल उपक्रमाला उल्लेखनीय यश मिळाले असून आतापर्यंत २० हजार धुररहित चुलींचे वितरण पूर्ण करण्यात आले आहे.क्लीन मॅक्स उर्जित एलएलपी आणि क्लायमेटसेन्स प्रायव्हेट लिमिटेड(फार्मर्स फॉर फॉरेस्ट समूह)यांच्या सहकार्याने राबविण्यात आलेला हा उपक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शाश्वत विकास आणि पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पनेला बळ देणारा ठरत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करत धानोरा व एटापल्ली भागात राबविण्यात आलेला हा प्रकल्प आदिवासी कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणारा असल्याचे म्हटले आहे.या धुररहित चुलींमुळे घरातील धूर आणि वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होत असून जळाऊ लाकडावरील अवलंबित्व लक्षणीयरीत्या घटले आहे. परिणामी महिलांचे आरोग्य सुधारण्यास मदत होत असून जंगलांवरील ताण कमी होऊन वनसंवर्धनाला चालना मिळत आहे.हा यशस्वी उपक्रम राज्यातील इतर आदिवासी जिल्ह्यांमध्येही राबविण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतो,असेही त्यांनी नमूद केले आहे.या प्रकल्पाच्या परिणामांचा आढावा घेतला असता शंभर टक्के लाभार्थी कुटुंबांनी घरातील धूर आणि वायुप्रदूषणात लक्षणीय घट झाल्याचे सांगितले आहे.त्यामुळे महिलांमध्ये व बालकांमध्ये आढळणाऱ्या श्वसनविकार,डोळ्यांची जळजळ तसेच धुरामुळे उद्भवणाऱ्या इतर आरोग्य समस्यांमध्ये घट होण्यास मदत होत आहे.स्वच्छ आणि धुररहित स्वयंपाकघरामुळे ग्रामीण भागातील कुटुंबांच्या जीवनमानातही लक्षणीय सुधारणा होत आहे.
महिलांच्या सक्षमीकरणासाठीदेखील हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे.सुमारे ९५ टक्के कुटुंबांनी स्वयंपाक आणि जळाऊ लाकूड गोळा करण्यासाठी लागणाऱ्या वेळेत मोठी बचत झाल्याचे नोंदविले आहे. यापूर्वी अनेक महिलांना दररोज जंगलात जाऊन सरपण गोळा करावे लागत होते. सुधारित चुलींच्या वापरामुळे जळाऊ लाकडाची गरज कमी झाल्याने जंगलात जाण्याचे प्रमाण घटले आहे. परिणामी महिलांचा वेळ आणि श्रम वाचत असून त्यांना कुटुंब,शिक्षण, स्वयंरोजगार आणि इतर उपजीविकेच्या कामांसाठी अधिक वेळ देता येत आहे.या चुली धुररहित,इंधन बचत करणाऱ्या आणि वापरण्यास सुलभ असल्याने दुर्गम भागात कमी खर्चात स्वच्छ,सुरक्षित आणि शाश्वत स्वयंपाकाची सुविधा उपलब्ध होत आहे.त्यामुळे ग्रामीण भागात स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढण्यास मदत होत आहे.
आजपर्यंत १९ हजार ६०० हून अधिक कुटुंबांनी या सुधारित चुलींचा लाभ घेतला असून स्वच्छ आणि कार्यक्षम ऊर्जा वापराचा स्वीकार केला आहे.ग्रामीण भागातील ऊर्जा उपलब्धतेसाठी हा उपक्रम एक प्रभावी मॉडेल म्हणून पुढे येत आहे.
वनसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीनेही हा उपक्रम विशेष महत्त्वाचा ठरत आहे.सुधारित चुलींच्या वापरामुळे दरवर्षी ४१ हजार टनांहून अधिक जळाऊ लाकडाची बचत होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे जंगलांवरील अवलंबित्व कमी होऊन जैवविविधतेचे संरक्षण,पर्यावरणीय संतुलन आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करण्यास मदत होत आहे.याचबरोबर दरवर्षी अंदाजे ९ हजार २०० टन कार्बन डायऑक्साइड समतुल्य हरितगृह वायू उत्सर्जन टाळले जात असून हवामान बदलाच्या परिणामांना आळा घालण्यासाठीही हा उपक्रम महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेला हा उपक्रम स्वच्छ ऊर्जा,महिला सक्षमीकरण,वनसंवर्धन आणि हवामान बदल नियंत्रण या सर्व उद्दिष्टांना एकाच वेळी साध्य करणारा ठरला आहे.गडचिरोलीतील हा यशस्वी प्रयोग राज्यातील इतर आदिवासी व दुर्गम जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलीस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.. – ३ लाख रुपये घेतांना रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात गुन्हा 'बी' फायनल करण्यासाठी मदत केली व पुढे भविष्यातही अशीच मदत करण्यासाठी ८ लाख रुपयांची मागणी करून...

आज २२ मिनी सेतू केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.. दुर्गम भागात लोकाभिमुख डिजिटल प्रशासनाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई/गडचिरोली :-गडचिरोलीत नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली असून दुर्गम भागातील नागरिकांना केवळ प्रशासनाची उपस्थिती नव्हे,तर प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा...

वनहक्क पट्टेधारकांसाठी मोठा निर्णय; शेतकरी म्हणून मिळणार स्वतंत्र ओळख.. – विविध योजनांचाही मिळणार लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-वनहक्क पट्टेधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासींना आता सुधारित सातबारा मिळणार असल्याने...

गडचिरोली जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.. – खताची जादा दराने विक्री केल्यास करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व घाबरून न...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!