- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
प्रशांत गेडाम
सिंदेवाही(चंद्रपूर):-महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या महसुली विषयक तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी उद्या,गुरुवार २३ जुलै रोजी सकाळी १०:३० वाजता श्रवण लॉन,मूल रोड, सिंदेवाही येथे विशेष महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली सिंदेवाही तहसील कार्यालय यांच्या वतीने सदरचे शिबिर होणार आहे.
या शिबिरात ७/१२ व फेरफार नोंदी,रेशन कार्ड, उत्पन्न,जात,अधिवास व इतर प्रमाणपत्रे,जमीन अभिलेखाशी संबंधित बाबी तसेच इतर महसुली तक्रारी व अर्ज स्वीकारून त्यांचे तातडीने निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.तालुक्यातील नागरिकांनी आपल्या संबंधित महसुली समस्या व तक्रारींचे निराकरण करून घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह शिबिरास उपस्थित राहावे आणि शासनाच्या महसूल सेवांचा लाभ घ्यावा,असे आवाहन सिंदेवाही महसूल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
- Advertisement -

