Thursday, July 23, 2026
Homeदेसाईगंजउद्याला देसाईगंज नगरीत आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य रास्ता...

उद्याला देसाईगंज नगरीत आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी न्यायाची मागणी करत दिल्लीत शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर करण्यात आलेला अमानुष लाठीचार्ज हा लोकशाही मूल्यांवर झालेला गंभीर आघात असल्याचा निषेध व्यक्त करत
आमदार रामदास मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेस कमिटी आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या वतीने उद्या,शुक्रवार २४ जुलै रोजी दुपारी २.३० वाजता कुरखेडा टी-पॉईंट,रेल्वे बोगद्याजवळ,देसाईगंज(वडसा)येथे भव्य रास्ता रोको आंदोलन आयोजित करण्यात येणार आहे.
काँग्रेस कमिटीने स्पष्ट केले की,पेपर फुटी,भ्रष्टाचार आणि विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करून त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न हा निषेधार्ह असून,अशा दडपशाहीचा काँग्रेस पक्ष तीव्र शब्दांत निषेध करत आहे.होऊ घातलेले आंदोलन हे कोणत्याही राजकीय हेतूने आयोजित करण्यात आलेले नसून न्यायासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सन्मानासाठी आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे ही समाजातील प्रत्येक जागरूक नागरिकाची जबाबदारी आहे.त्यामुळे या आंदोलनाकडे राजकीय दृष्टिकोनातून
न पाहता सामाजिक आणि लोकशाही हक्कांच्या लढ्याच्या दृष्टीने पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या आंदोलनात सर्व नागरिक,युवक,विद्यार्थी, सामाजिक संघटना तसेच सर्वपक्षीय लोकशाहीवादी नागरिकांनी कोणत्याही निमंत्रणाची वाट न पाहता मोठ्या संख्येने सहभागी होऊन न्यायाच्या लढ्याला आपला खंबीर पाठिंबा द्यावा,असे आवाहन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आरमोरीत जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते बारदाना निर्मिती उद्योगाचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हे केवळ स्वयंरोजगारापुरते मर्यादित न राहता शाश्वत उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणाऱ्या रोजगार क्लस्टरच्या माध्यमातून व्हावे.त्याचबरोबर जिल्ह्यात विकसित...

महाराष्ट्र बंदला विद्यार्थ्यांसह विविध सामाजिक संघटनांचा उत्सफुर्त प्रतिसाद . – शेकडो मोर्चेकऱ्यांच्या उपस्थितित राष्ट्रपतींना निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी आज,गुरुवार २३ जुलैला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.या हाकेला उत्सफुर्त प्रतिसाद देत विद्यार्थी,विविध सामाजिक...

आता स्मार्ट मीटरची तक्रार प्राप्त होताच लागणार ‘चेक मीटर’…

उद्रेक न्युज वृत्त :-आता ज्या ठिकाणी स्मार्ट मीटरबाबत तक्रार प्राप्त होईल,तेथे तात्काळ समांतर चेक मीटर बसविणे आवश्यक राहील.त्याचा संपूर्ण खर्च संबंधित स्मार्ट मीटर बसविणाऱ्या...

मार्गावर गाय आडवी आल्याने दुचाकी चालकाचा अपघाती मृत्यू; पत्नी आणि मुले बचावली..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-आपल्या स्वगावाहून पत्नी आणि दोन पाच वर्षांच्या मुलांसह दुचाकीने निघालेल्या दुचाकी चालकाचा नागपूर जिल्ह्याच्या खुर्सापार नजीकच्या मार्गावर अचानक गाय आडवी आल्याने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!