Monday, March 17, 2025
Homeआरमोरीआरमोरी येथे भारताचं विद्यापीठ रमाई महाकाव्य ग्रंथाचे प्रकाशन सोहळा संपन्न...
spot_img

आरमोरी येथे भारताचं विद्यापीठ रमाई महाकाव्य ग्रंथाचे प्रकाशन सोहळा संपन्न…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी येथील पंचशील बुद्ध विहारात,संगीता वाल्मीक रामटेके(पाटील)यांनी आयोजित भारताचं विद्यापीठ रमाई महाकाव्यग्रंथाचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला असून भारताचं विद्यापीठ रमाई महाकाव्यग्रंथाचे संपादक प्रा.डॉ. अशोककुमार दवणे,नांदेड यांनी संपादन केलेल्या रमाई महाकाव्यग्रंथाचे प्रकाशन सामाजिक कार्यकर्त्या भूमिका बागडे यांचे हस्ते करण्यात आले.तर प्रकाशन सोहळ्याचे उद्घाटक म्हणून प्रा.जय फुलझेले आरमोरी यांनी तथागत भगवान बुद्ध,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन करून दीप प्रज्वलीत केले.  कार्यक्रमाचे अध्यक्षपद लता बरसागडे यांनी भूषविले तर सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मीना सहारे  सामाजिक कार्यकर्ता इंदुरकर,सामाजिक कार्यकर्ते रोडगे,सिद्धार्थ साखरे,बारसागडे,शेंडे,पौर्णिमा पाटील, वणी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ती, कवयित्री,साहित्यिक संगीता रामटेके (पाटील) ह्यांनी केले.महाकाव्य ग्रंथाचा इतिहास अजरामर व्हावा,रमाईच्या जीवनावरील अनमोल दस्ताऐवज हा रमाई महाकाव्य ग्रंथाची प्रथमच निर्मिती करण्यात आलेली असून,महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्ह्यांमध्ये १५० ठिकाणी एकाच दिवशी प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.भारताचं विद्यापीठ रमाई महाकाव्यग्रंथात ३६९ कवी,कवियत्रिच्या कवितांचा समावेश असून त्यात गडचिरोली जिल्ह्यातील एकूण ११ कवी,कवियत्रीच्या कविता रमाई महाकाव्यग्रंथामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.
प्रसंगी सोहळ्याच्या अध्यक्षा लता बरसागडे म्हणल्या की,ग्रंथात रमाई जीवनावर कवींनी आपल्या रचना शब्दबध्द केल्या आहेत.हा ग्रंथ वाचनीय आहे तो सर्वांनी वाचावा.प्रा.जय फुलझेले यांनी सांगितले की, भारतचं रमाई महाकाव्य ग्रंथ इतिहासात अजरामर होणारा महाकाव्य ग्रंथ आहे.प्रथमच रमाई ग्रंथ प्रसिद्ध झाला झाला असल्याने याची इतिहासत नोंद होईल, असे मार्गदर्शन केले.तसेच रोडगे म्हणाले की,हा काव्य संग्रह नसून तो एक महाकाव्य ग्रंथ असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन मानसी पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार सिद्धार्थ साखरे यांनी मानले.प्रकाशन सोहळ्याच्या यशस्वीतेकरीता राजकुमार देशपांडे,राजेंद्र बनसोड,छोटी बागडे,बादल शेंद्रे व समस्त उपासक,उपासिका यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बंद ग्रामपंचायतीचे कुलूप तोडून अज्ञाताने ग्रामपंचायतीची कागदपत्रे जाळली..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ब्रम्हपुरी तालुक्यातील पारडगाव ग्रामपंचायत येथील सुट्टीच्या दिवसांची संधी साधून अज्ञाताने बंद ग्रामपंचायतीचे कुलूप तोडून कार्यालयातील लोखंडी आलमारीतील महत्वाची कागदपत्रे पेट्रोल ओतून...

२२ वर्षीय तरुणीची राहत्या घरीच गळफास

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील चिचोली येथे एका २२ वर्षीय तरुणीने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रविवार सकाळच्या सुमारास उघडकीस...

दुचाकी स्लीप होऊन बसचे चाक डोक्यावरून गेल्याने महिलेचा घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-पती-पत्नी आणि मुले घेऊन आपले स्वगावी दुचाकीने जात असतांना वाटेतच दुचाकी स्लीप होऊन समोरून येणाऱ्या बसचे चाक खाली कोसळलेल्या पत्नीच्या डोक्यावरून...

वाघाचे अवयव शिकार प्रकरणी धक्कादायक माहिती; सट्टापट्टीत आकडे सांगण्यासाठी वाघाच्या अवयवांचा वापर..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर प्रादेशिक वनविभागांतर्गत येणाऱ्या खापा वनपरिक्षेत्रात वाघाची शिकार झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली असून अज्ञात शिकाऱ्यांनी वाघाचे चारही पंजे,मिशा आणि दात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!