Thursday, August 27, 2026
Homeगडचिरोलीअखेर धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; धान विक्री नोंदणीला मुदतवाढ...

अखेर धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; धान विक्री नोंदणीला मुदतवाढ…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभावाने धानाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करावी लागते.त्याशिवाय धानाची विक्री करता येत नाही.सुरुवातीला शासनाने नोंदणीसाठी १५ नोव्हेंबरपर्यंतच मुदत दिली होती.परंतु अनेक शेतकऱ्यांची नोंदणी अद्याप रखडलेली आहे.त्यामुळे नोंदणीला १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याने शेतकऱ्यांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये; यासाठी शासन खरीप आणि रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून शासकीय धान खरेदी केंद्रावरून धान खरेदी करते.धान खरेदी केंद्रावर खरेदी दरम्यान होणाऱ्या अनागोंदी कारभाराला वचक बसवा,यासाठी गेल्या वर्षीपासून शासनाने शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य केले आहे.यासाठी ई-पीक नोंदणी व त्यातील पीक पेऱ्याची नोंदणी
महत्त्वाची आहे.जिल्ह्यात लाखावर शेतकरी असून,यापैकी दरवर्षी लाखो शेतकरी शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करतात.यंदा दिवाळी संपली तरी धान खरेदीला सुरुवात झालेली नाही. नोंदणी उशिराने सुरू झाल्याने धान खरेदीस विलंब झाला.लाखो शेतकरी नोंदणीपासून वंचित आहेत. त्यामुळे शासनाने धान विक्रीसाठी नोंदणीला १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.यामुळे जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!