उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी :- समाजातील अज्ञान अंधश्रद्धा आणि अंधकार दुर करण्यासाठी शिक्षण एकमेव मार्ग आहे. ज्याच्यातून माणसाला माणूस म्हणून जगायचे कसे हे कळते आणि तो स्वतःसोबतच ईतरांसाठीही जगू शकतो;या उद्देशाने महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी येथील रासेयो स्वयंसेवकांनी शिबीर आयोजित करण्यात आलेल्या तालुक्यातील रामपुर गावात शिक्षण दिंडी काढत शैक्षणिक वातावरण निर्मीतीसाठी प्रयत्न केले.
दिंडीमध्ये महापुरुषांचे विचार व संताच्या शिक्षणाचे महत्व पटवून देण्याऱ्या भजनांनी गावात एक सकारात्मक शैक्षिणिक व सामाजिक वातावरण निर्माण केले.दिंडीत सावीत्री माईंच्या जीवनावरील उर्जात्मक गीते,माता पालक जनजागृति कर्त्तव्य आणि जबाबदाऱ्या यांवर आधारीत भजने व शिक्षणाचे महत्व पटवून देणारे उर्जा गीते घेत संपूर्ण गावात ही शिक्षण दिंडी काढली गेली.गावकऱ्यांनी या दिंडीत सहभागी होवून ढोलकी,मंजीरे आणि भनान्याच्या गजरात राष्ट्रसंत तुकोजी महाराज व महापुरुषांचे विचार भजनांच्या माध्यमातून मांडून दिंडीला एक वैचारिक रुप दिला.
सोबतच नविन शैक्षणिक धोरण २०२० व निपुण भारत उपक्रमावीषयी पथनाट्याच्या माध्यमातून जनाजागृती करण्यात आली.चल शाळेला चल,चल तारा, तुमच्या लाळक्या लेकीला तुम्ही शाळेत पाठवा, पाठी न पेंसिल घेवू द्या कीरं,शाळा शिकतांना तहान भुक हरली रे,हे गाणे ढोलकी आणि भजणाच्या तालात म्हणत स्वयंसेवक शैक्षणिक दिंडीत अगदी दंगून गेले होते…
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रामपुर येथिल विद्यार्थ्यांनी सुद्धा या शिक्षण दिंडीत सहभागी होवून,मोळी विकू पण शाळा शिकू, शिकलेली आई घरादाराला सामोरे नेई अश्या घोषवाक्यांतून गावात या शैक्षणिक दिंडीची शोभा वाढवीली.दर वर्षी रासेयो शिबीराच्या शेवटच्या दिवशी महात्मा गांधी माहाविद्यालय आरमोरी येथिल रासेयो स्वयंसेवक शैक्षणिक दिंडी काढत शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न करतात.शिबीरात अश्या शैक्षणिक दिंडीची सुरवात २०२० ला अंतर्ज येथे महाविद्यालयचे माजी उत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक सुरज चौधरी,धनपाल वैद्य,आकाश सामृतवार,सारंग जांभुळे, व तत्कालीन स्वयंसेवकांच्या संकल्पनेतून झाली होती. तेव्हा पासून शिबीराच्या शेवटच्या दिवशी ही दिंडी गावकऱ्यांसाठी आकर्षण असते.शैक्षणिक दिंडीच्या यशस्वीतेसाठी रामपुर येथिल उपसरपंच प्रविन ठेंगेरी, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक वाटगुरे सर,विष्णूदास खरकाटे,घनश्याम डोर्लीकर, हरीषचंद्रजी खरकाटे,पोलीस पाटील कामीनी ताई राऊत,वसंत समर्थ रासेयो कार्यक्रम अधिकारी संतेद्र सोनटक्के,प्राध्यापीका सिमा नागदेवे,प्राध्यापीका कवीता खोब्रागडे व शेकडो गावकऱ्यांनी सहकार्य केले.