उद्रेक न्युज वृत्त
नवी दिल्ली : –मागील काही दिवसांपासून बीबीसीने प्रदर्शित केलेल्या “इंडिया- द मोदी क्वेश्चन” या माहितीपटाची चांगलीच चर्चा होत आहे.या डॉक्युमेंट्रीवरुन गुजरात दंगलीदरम्यान गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या डॉक्युमेंट्रीवर बंदी आणली होती.वाद सुरू असतानाच आता बीबीसीच्या दिल्लीमधील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचे अधिकारी धडकले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बीबीसी कार्यालयात पाहणी केली जात आहे.बीबीसीच्या कार्यालयावर धाड टाकल्यानंतर कॉग्रेससह अनेक पक्षांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.देशात अघोषित आणीबाणी सुरू असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेसने दिली आहे.या धाडीनंतर बीबीसीकडून अधिकृतपणे पहिली प्रतिक्रिया आली आहे.ज्यामध्ये “आयकर अधिकारी सध्या नवी दिल्ली आणि मुंबई येथील बीबीसी कार्यालयात आहेत आणि आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत. ही परिस्थिती लवकरात लवकर निवळेल अशी आम्हाला आशा आहे,” असे ट्विट बीबीसीकडून करण्यात आले आहे.